आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : बॉलिवूड बदलत आहे. रोज नवनवीन एक्सपेरिमेंट होत आहेत. सीनमध्ये प्राण टाकण्यासाठी कलाकार वाटेल ते करत आहेत. पण साउथ अभिनेत्री अमला पॉलने जे केले ते करणे सहज कुणाला शक्य होत नाही. आपण बोलत आहोत अमला पॉलचा आगामी चित्रपट 'अदाई' मधील एका खूप संवेदनशील सीनविषयी. 'अदाई' च्या टीजरमध्ये अमलाचा न्यूड सीन चर्चेचा विषय बनला आहे. आता स्वतः अमलाने पुढे येऊन या सीनशी निगडित एक किस्सा शेअर केला आहे.
एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने सांगितले, 'प्रत्येक न्यूड सीन मादक नसतो, हेच सत्य आहे, अमलाचा तो सीन 15 लोकांच्या (क्रू मेंबर) उपस्थितीत फीमेल डायरेक्टरच्या दिग्दर्शनात चित्रीत केला गेला. अमलाचे म्हणणे आहे की, असे करणे सोपे नसते. स्वतःसाठी आव्हान असते की, कसा लोकांसमोर अशाप्रकारचा सीन केला जाऊ शकतो.'
अमलाने सांगितले, जेव्हा डायरेक्टर रत्ना कुमार म्हणाल्या की, शूट खूप संवेदनशील आहे आणि त्यावेळी कमीत कमी 15 लोक तिथे उपस्थित असतील. तेव्हा ती काळजीत पडली. रत्ना कुमार म्हणाल्या की, स्पेशल कॉस्ट्यूम घालून घे पण अमला परेशान होती. अमलाने स्वतः सांगितले की, मग तिने विचार केला की, क्रू मेंबरवर विश्वास ठेवावा लागेल. हेच तर ते लोक आहेत जे प्रत्येक सीन जीवंत करतात. ती डायरेक्टरला म्हणाली की, तुम्ही चिंता करू नका सीन होऊन जाईल. मग अमलाने 15 क्रू मेंबरच्या उपस्थितीत न्यूड सीन केला. हे खूप हैराण करणारे आणि संवेदनशील आहे. यामध्ये रेप व्हिक्टीमचे भयावह सत्य आणि वेदना दाखवल्या गेल्या आहेत.
अमला म्हणाली की, जर त्या दिवशी मी शूटमध्ये असलेल्या लोकांवर विश्वास ठेवला नसता तर कदाचित तो सीन क्रिएट होऊ शकला नसता. अमला म्हणाली की, 'अदाई' पूर्वी ती चित्रपट सृष्टी सोडण्याचे मन बनवत होती. कारण तिला जे रोल मिळत होते ते खोटे वाटत होते. पण 'अदाई' चा जबरदस्त आणि आव्हानांनी भरलेल्या टीजरनंतर अपेक्षा आहे की, चित्रपटांचीही कौतुक होईल आणि अमलाचे करियरदेखील चांगल्या प्रकारे घडेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.