• Home
  • Khabrein jara hat ke
  • Ammon made one mistake and 9 million camera gear was sold for only 6,500 rupees, people said 'Thank Jeff Bejos...'

Entertainment / अॅमॅझॉनने केली एक चूक आणि 9 लाखांचा कॅमेरा गेयर विकला गेला केवळ 6500 रुपयांना, लोक म्हणाले - 'थँक्यू जेफ बेजोस... '

कॅननचा EF 800mm f/5.6L IS लेंस 9 लाख रुपयांचा आहे

दिव्य मराठी

Jul 22,2019 06:18:17 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : ई-कॉमर्स वेबसाइट अॅमॅझॉनच्या प्राइमडे सेलची सर्वच जण वाट पाहत असतात. येथे लोकांना खूप डिस्काउंट मिळते. यावर्षी प्राइम डे सेल 15 जुलै ते 16 जुलै होता. हा सेल केवळ भारतातच नाही तर जगभरात होता. अॅमॅझॉनने प्राइम डे सेलमध्ये एक चूक केली ज्याचा फायदा बायर्सने घेतला. एका कॅमेरा गेयरची किंमत 9 लाख रुपये होती, ज्याची किंमत चुकून 6500 रुपये ठेवली गेली. लोकांनी तो खरेदी केला.

कंपनीच्या जशी ही चूक लक्षात आली त्यांनी ती तात्काळ दुरुस्त केली. पण हटवण्यापूर्वीच अनके लोकांनी तो खरीदी केला होता. खरेदी केल्यानंतर लोक अॅमॅझॉनचे मालक जेफ बेजोसला थँक्यू म्हणत आहेत आणि अॅमॅझॉनचे खूप कौतुक करत आहेत. पण प्रश्न हा आहे की, आता कंपनी खरेदी केलेले हे कॅमेरा गेयर डिलिव्हरी करेल की, नाही ? लोकांनी कॅननचा EF 800mm f/5.6L IS लेंस खरेदी केला आहे.

कॅननचा EF 800mm f/5.6L IS लेंस 9 लाख रुपयांचा आहे. जो अॅमॅझॉनवर 6500 रुपयांमध्ये अव्हेलेबल होता. काही वेळ झाल्यानंतर ते हटवले गेले. एका व्यक्तीने रेडिटवर लिहिले, 'मी काल रात्री प्राइम डे सेलमध्ये 3 हजार डॉलरचा कॅमेरा 94 डॉलरमध्ये खरेदी केला. तुम्हाला काय वाटते ते शिप करतील की, कॅन्सल करतील, कारण ती एक चूक होती.' कॅननचा हा गेयर प्रोफेशनल्स वापरतात. खूप कमी लोक हा सर्च करतात.

X