आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमोल पालेकर, डेन्मार्क आणि हॅम्लेट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रपट निर्माते अमोल पालेकर २४ नोव्हेंबरला आपली पंचाहत्तरी संध्या गोखले यांनी लिहिलेल्या नाटकात अभिनय करीत रंगमंचावर साजरी करणार अाहेत. संध्या गोखलेंनी डेन्मार्कमध्ये बनलेल्या एका चित्रपटावरून प्रेरित होत हे नाटक लिहिले आहे. महाराष्ट्रातही सेन्सॉर बोर्डाला नाटक दाखवून सादरीकरणाची परवानगी घ्यावी लागते. भारतात असे कायदे असून त्यातून जावेच लागते. प्रजासत्ताकाचे आदर्श पाण्याप्रमाणे असून ज्या भांड्यात ओतू, तसा ते आकार घेतात. अमोल पालेकर २५ वर्षांनंतर रंगभूमीवर परतणार आहेत. ते एक बँक कर्मचारी होते. शनिवारी व रविवारी ते नाटकात काम करायला जात. निर्माते बासू चटर्जींनी त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी दिली. त्यानंतर मध्यमवर्गीयांच्या जीवनातील अडचणी मांडणारे चित्रपट बनू लागले. अमोल पालेकर आणि उत्पल दत्त यांची भूमिका असणारा हृषीकेश मुखर्जींचा 'गोलमाल' खूप गाजला. नंतर या शीर्षकावरून अजय देवगणचे अनेक चित्रपट आले. यातूनच अजयने अॅक्शनपटातून विनोदीपटात प्रवेश केला. संध्या गोखलेंच्या नाटकाची कथा वाचूनच पालेकर यांनी त्यात अभिनय करण्याचे ठरवले आणि पत्नीचा अादेश कोणताही महापुरुष टाळू शकत नाही. काही जण म्हणतात की, पत्नीमुळेच आम्ही घरावर राज्य करू शकतो. यात महिलांना दुय्यम दर्जाचे स्थान देणे, त्यांच्या व्यंगावर बोलणे हा त्याचाच एक भाग असावा. बँकेच्या नोकरीपासून सुरुवात केलेल्या पालेकर यांनी रंगभूमीवर काम करीत चित्रपटात प्रवेश केला आणि नंतर ते दिग्दर्शकही बनले. राजस्थानचे महान लेखक विजय दान देथा यांच्या कथेने प्रेरित होत त्यांनी पहेली नामक चित्रपट बनवला. त्यात लोभी वडिलांमुळे मुलाला लग्नानंतर घर सोडावे लागते. बऱ्याच दिवसांनंतर त्या विवाहितेची नणंद पती परत येण्यासाठी प्रार्थना करण्यास सांगते. पण पत्नीप्रेमासाठी न आलेला पती देवाची प्रार्थना करून कसा येईल, असे ती नववधू उत्तरते. यादरम्यान एक आत्मा त्या पतीचे रूप धारण करून परतत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतो. यातच एका कन्येचा जन्म होतो, जिचे नाव 'उजाली' ठेवले जाते. परंतु एका शरीर नसलेल्या आत्म्याकडून देह असणारा जीव कसा येऊ शकतो, यावर अजून प्रश्नचिन्ह आहेच. सर रिचर्ड बर्टन यांच्या 'बॉडी अँड सोल' या कादंबरीची कथाही अशीच आहे. यातील नायक एका पाण्याच्या जहाजात काम करीत असून महिनोन॰महिने पत्नीपासून दूर राहत असतो. जहाजाच्या एका खोलीत तो इतक्या आर्ततेने पत्नीला आळवतो, तेव्हा ती पत्नी सशरीर हजर हाेते. तो तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करतो व मित्रांना चुरगाळलेले अंथरूण दाखवतो. ज्याचा अर्थ वाचता येऊ शकतो. वयस्कर लोकांच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या म्हणजे तो त्यांचा अनुभव असतो. निसर्ग जागोजागी बऱ्याच गोष्टी लिहीत असतो, पण आपण त्या वाचू शकत नाही. तसेच आगामी दोन-तीन वर्षांत येणाऱ्या जागतिक आर्थिक मंदीचा अर्थ लोक वाचू शकत नाहीत. संध्या गोखले यांच्या नाटकातील नायक शेक्सपिअरचे अजरामर पात्र हॅम्लेटप्रमाणे द्विधा मन:स्थितीत आहे का? तो त्याच्या आई व काकांकडून करण्यात आलेल्या वडिलांच्या खुनाचा बदला कुणाचा खून करून घ्यावा? प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात अशा मानसिकतेत असतो. असमान जीवनसंग्रामात हा नि:शस्त्र सैनिक खूप साहसी असतो. अशी म्हण आहे की, राजकुमार हॅम्लेटच्या अनुपस्थितीत डेन्मार्कही डेन्मार्क म्हणून राहू शकत नाही. तसेच संसद उभी करणारा सामान्य नागरिक संसदेत अदृश्यच राहतो.

जयप्रकाश चौकसे चित्रपट समीक्षक
jpchoukse@dbcorp.in
 

बातम्या आणखी आहेत...