आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पंकजा मुंडेच काय, भाजपचे बडे नेते आमच्या संपर्कात', संजय राऊतांचा खळबळजनक दावा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फेसबूक पोस्टनंतर मुंडे पक्ष सोडणार असल्याचा चर्चा सुरू

नाशिक- पंकजा मुंडेसोबत भाजपचे अनेक नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. पंकजा मुंडेनी केलेल्या फेसबूक पोस्टनंतर त्या भाजपला सोडचिठ्ठी देणार, या चर्चांना उधाण आले आहे. यावर संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फक्त पंकजा मुंडेच नाही तर राज्यातले भाजपचे बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषद बोलत होते. 
पंकजा मुंडे लवकरच राजकीय भूकंप घडवणार अशा चर्चा सुरू असताना संजय राऊतांनी हे विधान केल्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये पंकजा मुंडेचा भाऊ धनंजय मुंडेंकडून धक्कादायक पराभव झाला. त्यानंतर राज्यातील सत्ता भाजपने गमावली. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आता स्थापन झाले आहे. या सर्व घडामोडीनंतर पंकजा मुंडे यांनी राज्यात राजकीय भूकंप घडवण्याची तयारी सुरु केली असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. रविवारी पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसाठी फेसबूकवर पोस्ट लिहिली आहे. आपला निर्णय, भविष्यातील भूमिका त्या 12 डिसेंबरला जाहीर करणार आहेत.