Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | Amravati private bus accident kills one, injures dozens

Accident: अमरावतीत श्रीराम ट्रॅव्हेल्सची बस उलटली; एका महिलेचा जागीच मृत्यू, 40 प्रवाशी जखमी

प्रतिनिधी, | Update - Jun 15, 2019, 05:37 PM IST

बसचा चालकही गंभीर जखमी, पण लोकांच्या भीतीने काढला पळ

  • Amravati private bus accident kills one, injures dozens

    मोर्शी (अमरावती) - मोर्शी चांदूरबाजार रस्त्यावर शनिवारी सकाळी श्रीराम ट्रॅव्हेल्सच्या प्रवाशी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून जवळपास 40 प्रवाशी जखमी आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास अंजनगाव वरून पांढुर्णा येथे मोर्शीमार्गे ही बस जात होती. बस क्र.MH 27 BF 501 माधापुरी शिवारात वळणदार रस्त्यावर अचानक उलटली. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.


    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव करुणा सोपान मालधुरे (45) असून त्या पांढुर्णा येथील रहिवासी होत्या. इतर जखमी झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. गंभीर जखमींमध्ये नफिसा बानो (50), मोहंमद हफिज हबीब खान (35), गणेश विठ्ठल दाते (58), अनिता रमेश देऊळकर (42), पुष्पा विजय ढोले (45), कमला भाऊराव देउळकर (60), विजयसिंह ठाकूर (44) राजेंद्र मारुती लोखंडे (45), पुष्पा राजेंद्र लोखंडे (40), सुभाष सदाशिव शिरभाते (67), सोनाली शिरीष बेलसरे (40), रमेश गणपत आमले, चंद्रशेखर पुरुषोत्तम कोरडे, भीमराव चरपे, शांताबाई चरपे, विनोद यशवंत डेहनकर, इत्यादींचा समावेश आहे. इतर जखमींपैकी काहींना किरकोळ दुखापत झाली. तर काहींना मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गंभीर जखमींमध्ये बसचा चालक साजिद याचा देखील समावेश आहे. परंतु, लोकांच्या भीतीने त्याने घटनास्थळावरून पळ काढला.

  • Amravati private bus accident kills one, injures dozens
  • Amravati private bus accident kills one, injures dozens

Trending