आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amravati's Babita Becomes Millionaire, 'Kaun Banega Crorepati 11' Show Gets It's Second Millionaire Of This Year

अमरावतीच्या बबिता बनल्या करोडपती, 'कौन बनेगा करोडपती 11' या शोला मिळाला यावर्षीचा दुसरा करोडपती 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'कौन बनेगा करोडपती 11' या शोमध्ये पहिला करोडपती तर मिळाला, ज्याचे नाव सनोज राज आहे. मात्र आता केबीसीला दूसरा करोडपातीही मिळाला आहे. हा करोडपती एक महिला आहे. त्यांचे नाव बब‍िता आहे. सोनी टीव्हीच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला गेला आहे. या व्हिडिओमध्ये बब‍िता यांचा करोडपती बनण्याच्या प्रवासाची एक झलक दाखवली गेली आहे. 
बब‍िता या महाराष्ट्रातील अमरावती येथील रहिवासी आहेत. या आठवड्यात त्या शोमध्ये दिसणार आहेत. बबिता यांचे जीवन संघर्षाने भरलेला आहे. याचा अंदाज बबिता यांच्या एका उत्तराद्वारे लावला जाऊ शकतो. झाले असे की, अमिताभ बच्चन त्यांना विचारतात की, तुम्हाला पगार किती मिळतो ? यावर हसत हसत बब‍िता म्हणतात की, 1500 रुपये. हे ऐकून अमिताभ बच्चन हैरान होतात. 

बब‍िता यांनी सांगितले की, 'मी शाळेत ख‍िचडी बनवण्याचे काम करते. मुलांना मी बनवलेली खिचडी फार आवडते.' सोनी टीव्हीच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बब‍िता यांच्या आयुष्याची एक झलक दाखवली गेली आहे.   

बातम्या आणखी आहेत...