आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: युवकाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेह स्वीकारण्यास नातलगांचा नकार 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवकाच्या संशयास्पद मृत्यूनंतर उपजिल्हा रुग्णालयात गोळा झालेले बॉबीचे नातेवाईक. इन्सेट. मृतक बॉबी. - Divya Marathi
युवकाच्या संशयास्पद मृत्यूनंतर उपजिल्हा रुग्णालयात गोळा झालेले बॉबीचे नातेवाईक. इन्सेट. मृतक बॉबी.

परतवाडा- शहरातील रवी नगर येथील बेपत्ता असलेल्या बॉबी ऊर्फ अभिलाष मोहोड (वय १९) याचा मृतदेह आज नरसाळा शिवारातील विहिरीत आढळून आला. दरम्यान बॉबीचा मृत्यू घातपात असल्याने संबंधितांवर खुनाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करून नातेवाइकांनी मृतदेह घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. दरम्यान, पोलिसांनी पंजाबराव धाब्याच्या संचालकांसह वेटरवर गुन्हे दाखल करून सामंजस्याने तोडगा काढल्यानंतर उशिरा बॉबीवर अंत्यसंस्कार केले. 


धारणी मार्गावरील श्री पंजाबराव पाटील वऱ्हाडी ढाब्यावर १ फेब्रुवारी रोजी रवीनगर येथील बॉबी मोहोड आपल्या पाच ते सहा मित्रासह जेवण करण्यासाठी गेला होता. काही कारणावरून हॉटेलच्या वेटरसोबत तरुणांचा वाद होऊन हाणामारी झाली. त्यानंतर सर्व तरुण पळून गेले व घरी पोहोचले. परंतु बॉबी घरी न परतल्याने त्याचा शोध सुरू झाला. त्यामुळे सुखरूप घरी न आल्याने कुटुंबीयांनी ठाण्यासमोर ठिय्या दिला. मारोतराव सीताराम मोहोड यांनी परतवाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीवरून नीलेश गजानन भाकरे व हॉटेल मालकासह २५ ते ३० कर्मचाऱ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. दरम्यान सोमवारी नरसाळा शिवारात बॉबीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. या घटनेनंतर बॉबीच्या नातेवाइकांनी हा घातपात असून त्याला लोखंडी रॉडने जखमी करून त्याच्यावर हल्ला करून त्याची हत्या केल्याचा आरोप करून संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान आज बॉबीच्या नातेवाइकांनी उपजिल्हा रुग्णालयात त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. दरम्यान पोलिसांच्या मध्यस्थीनंतर बॉबीचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. 


तपास सुरू आहे, दोषीवर कारवाई होणार 
घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी धाब्यावर झालेल्या वादाचे दोन्ही पक्षांकडून तक्रारी घेऊन दखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर युवक बेपत्ता असल्याने त्याचा तपास करून हॉटेल मालक व कर्मचा­ऱ्यावर गुन्हा दाखल केला. - सदानंद मानकर, ठाणेदार, परतवाडा. 

 

बॉबी विहिरीत पडला? 
पंजाबराव पाटील ढाब्यावर चार दिवसांपूर्वी झालेल्या या घटनेच्या अनुषंगाने मिळालेल्या माहितीनुसार रवीनगर व विदर्भ मिल येथील पाच ते सहा युवक हॉटेलमध्ये वाढदिवसानिमित्त पार्टी करण्याकरिता गेले होते. दरम्यान वेटर व युवकांचा वाद विकोपाला गेला. या दरम्यान झालेल्या मारामारीनंतर पळापळ झाली. यात बॉबी मोहोड पळाला असता त्याच्या मागे कुत्रे धावल्याने तो विहिरीत पडला. परतवाडा पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यातही हे मुले पळताना दिसत असल्याचे म्हटले आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...