आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी अपघातात भंडारजच्या युवकाचा मृत्यू, आई गंभीर; चांदूर बाजार मार्गावरील तोंडगाव फाट्यानजीक घडली घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतवाडा - समोरील मालवाहू वाहनाला धडक देऊन दुचाकीला झालेल्या अपघातात भंडारज येथील आकाश सुधाकर चोपकार (२५) याचा मृत्यू झाला, तर त्याची आई कमल सुधाकर चोपकार (४५) गंभीर जखमी झाल्या. ही घटना मंगळवार, ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास चांदूर बाजार मार्गावरील तोंडगाव फाट्यानजीक घडली. भंडारज येथील आकाश चोपकार हे आई कमल चोपकार यांच्यासह दुचाकीने (एमएच २७ बीपी ४५५१) चांदूर बाजारकडे जात होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास आकाशच्या दुचाकीची तोंडगाव फाट्यानजीक समोरील मालवाहू वाहनाला धडक बसली. यात आकाशचा घटनास्थळी मृत्यू झाला. जखमी कमल चोपकार यांना तोंडगाव येथील सचिन कडू, गजानन खडके, तुषार खडके, मुरलीधर आवारे यांनी उपचारासाठी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. 

 

बातम्या आणखी आहेत...