आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसमधून आलेल्या माजी आमदाराला भाजपकडून उमेदवारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 30 मार्चला धुळे-नंदुरबार विधानपरिषदेची पोटनिवडणूक होणार आहे

मुंबई- राज्यसभा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीसह भाजपने धुळे नंदुरबार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये आलेल्या अमरिश पटेल यांनाच भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.

धुळे नंदुरबार विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मार्चच्या पहिल्या आठवडण्यात पोटनिवडणूक जाहीर केली. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये आलेल्या अमरिश पटेल यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. या जागेसाठी 30 मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार असून 31 मार्चला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे धुळे विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठीही शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची एकजूट होण्याची चिन्हे आहेत. महाविकास आघाडीकडून कोणता उमेदवार रिंगणात उतरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.  राज्यसभेसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख उद्या (13 मार्च) आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार आहे. यात भाजपने उदयनराजे भोसले, भागवत कराड आणि रामदास आठवलेंना उमेदवारी दिली आहे. तर, राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि फौजिया खान असतील. तसेच, शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी तर काँग्रेसकडून राजीव सातव यांच्या नावाची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...