आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचे जीवन तुमच्या हाती (अमृत साधना)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्पना करा, एखाद्या सकाळी तुम्ही जागे होणार आणि तुम्हाला विश्वास वाटू लागेल की तुम्ही वास्तवात तुमचे जीवन निर्मित करू शकता. अगदी तुमच्या मनाजोगे. आता कोणत्याही नशीब किंवा प्रारब्धाच्या हाती तुमचा दोर नाही. तुम्ही कठपुतळी नाहीत. याचा अर्थ तुम्ही निवड करू शकता. सुखी राहा अथवा दु:खी. सृजनात्मक वा विध्वंसक. यशस्वी वा अपयशी. किती मोठी सुवार्ता असेल ही! आता तुम्हाला वाटू लागेल की, हे नजीकच्या भविष्यात तरी शक्य नाही अथवा पुढच्या जन्मीच हे शक्य आहे. पुढच्या जन्मीची स्वप्ने पाहू नका. हे आजच शक्य आहे. सर्वप्रथम आपल्या जीवनाकडे प्रामाणिकपणे व तटस्थतेने पाहा. खरच जीवन इतके दु:खद किंवा अडचणींचे आहे का? तुम्ही विचार करता तितके कठीण आहे का? तुम्ही तुमच्या जीवनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करता का? अनेकदा लोक आपल्या विचारांना आपल्या आयुष्यावर थोपवतात. मोठमोठ्या योजना बनवतात. त्या यशस्वी होतीलच अशी आशा बाळगतात. शेवटी पदरी दु:ख पडते. कारण योजना यशस्वी होत नाहीत. मात्र, त्या योजना यशस्वी होणारच नव्हत्या. नव्या संशोधनानुसार, अनियोजित अनुभवांमुळे मौल्यवान वस्तू घडतात. त्यात रोमांच असतो. सुनियोजित दिवसांमध्ये केवळ दैनंदिन कामे होतात. कंटाळवाणे वाटू लागते.
स्वत:चे जीवन निर्मित करायचे असेल तर दुसरी पद्धती आहे. तुमचा वेळ तुम्ही निर्मित करा. तुमच्या कामांवर, विचारांवर, भावनांवर एक नजर टाका. त्यानंतर ध्यानात येईल त्यात किती निरर्थकता आहे ते. त्यात वेळेचा अपव्ययही होतो. यातून तुम्ही काटछाट करू शकता. तुमचा दिवस सामानाने भरगच्च असलेल्या सुटकेससारखा आहे काय? तुमच्या मनावर जो अनावश्यक ताण आहे तो अाधी दूर करा.
बातम्या आणखी आहेत...