Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Amritamohotsav Gaurav Ceremony of Ramdas Futane on Sunday

रामदास फुटाणे यांचा रविवारी अमृतमहोत्सवी गौरव सोहळा; किशोर सानप लिखित पुस्तकाचे प्रकाशन

प्रतिनिधी | Update - Aug 24, 2018, 12:45 PM IST

ख्यातनाम कवी, लेखक, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आणि वात्रटिकाकार म्हणून परिचित असणारे रामदास फुटाणे यांचा अमृत महोत्सवी

  • Amritamohotsav Gaurav Ceremony of Ramdas Futane on Sunday

    सोलापूर- ख्यातनाम कवी, लेखक, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आणि वात्रटिकाकार म्हणून परिचित असणारे रामदास फुटाणे यांचा अमृत महोत्सवी गौरव सोहळा रविवारी (ता. २६) आयोजित केला आहे. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सायंकाळी साडेपाचला हा कार्यक्रम होईल. तत्पूर्वी सकाळी दहा वाजल्यापासूनच कविसंमेलन आयोजित केले आहे. डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानच्या वतीने त्याचे आयाेजन केल्याचे सचिव बिपीन पटेल यांनी सांगितले.


    माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते फुटाणे यांचा सपत्नीक सत्कार होणार आहे. याच वेळी किशोर सानप लिखित 'रामदास फुटाणे यांची भाष्य कविता' या पुस्तकाचेही प्रकाशन करण्यात येणार आहे.


    खुमासदार कविसंमेलन
    डॉ. फडकुले सभागृहात सकाळी दहाला कविसंमेलन आयोजिले असून, त्यात नामवंत कवी सहभागी होणार आहे. फ. मुं. शिंदे, महेश केळुस्कर, अरुण म्हात्रे, प्रशांत मोरे, सुरेश शिंदे, नितीन देशमुख, तुकाराम धांडे, साहेबराव ठाणगे, रमणी सोनवणे, डी. के. शेख, भरत दौंडकर, नारायण पुरी, अनिल दीक्षित, अरुण पवार, इंद्रजित घुले आदींसह राज्यभरातील कवी सहभागी होतील. सोलापूरच्या कवींनाही आमंत्रित करण्यात आल्याचे श्री. पटेल म्हणाले.

Trending