आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी शोधत होते आपलेच हात-पाय, कित्येक मृतदेहांवर शिरच नव्हते; अमृतसर अपघाताचे Video, Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - पंजाबच्या जोडा रेल्वे फाटकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातात देशभर शोककळा पसरली आहे. दसऱ्याचा उत्सव साजरे करण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांना आपल्या मित्र-परिवारांचे मृतदेह शोधण्याची वेळ आली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीप्रमाणे, रुळावरून जाणाऱ्या भरधाव रेल्वेने हॉर्न सुद्धा वाजवले होते. परंतु, रावण दहन सुरू झाल्याने त्या फटक्यांच्या आवाजात ट्रेनचा आवाज दबला. लोकांनी ट्रेन दिसली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. विशेष म्हणजे, त्या रुळावरून एक नव्हे तर दोन ट्रेन गेल्या होत्या. अपघातानंतरचे दृश्य इतके भयंकर होते की लोक आपलेच हात आणि आपलेच पाय शोधत होते. तर काही मृतदेहांवर शिरच नव्हते. 

 

#WATCH The moment when the DMU train 74943 stuck people watching Dussehra celebrations in Choura Bazar near #Amritsar (Source:Mobile footage-Unverified) pic.twitter.com/cmX0Tq2pFE

— ANI (@ANI) 19 October 2018

एक तास उशीरा आल्या सिद्धूंच्या पत्नी
या कार्यक्रमात मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर यांची उपस्थिती होती. रावण दहन कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 6 वाजता निश्चित करण्यात आली होती. परंतु, सिद्धू यांच्या पत्नी एक तास उशीरा 7 वाजता पोहोचल्या होत्या. कार्यक्रमाला सुरुवात झाली तोपर्यंत खूप आंधार झाला होता. यासोबतच, त्या अपघातानंतर घटनास्थळावरून वेळीच निघून गेल्या असा आरोप केला जात आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, अपघाताच्या 15 मिनिटानंतर मला फोनवरून त्यासंदर्भातील माहिती मिळाली होती.

 

 

बातम्या आणखी आहेत...