आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला ठेवले सरणावर, दीड वर्षाच्या मुलाला दफन करताना रडतच बेशुद्ध झाली आई, मग कँडल मार्चमध्ये सिद्धूंनी केले लज्जास्पद काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - हे दोन फोटो दसऱ्याच्या संध्याकाळी रेल्वेखाली कटून झालेले 65 मृत्यू अन् त्यावर होत असलेल्या राजकारणाशी संबंधित आहेत. पहिल्या फोटोत 30 वर्षीय आरती, तिचा पती जितेंद्र अन् दीड वर्षांचा मुलगा शिवम हे आहेत. आरतीचा पती अन् मुलाचा दुर्घटनेत मृत्यू झाला होता.

 

नवज्योत सिद्धू अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमातही हसताना दिसून आले
सोमवारी दुपारी आधी आरतीच्या पतीवर अंत्यसंस्कार झाले, मग शिवमचा दफनविधी करण्यात आला. यादरम्यान आरती रडत-रडत बेशुद्ध झाली. दुसरा फोटो काँग्रेसच्या कँडल मार्चचा आहे. जो मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी काढण्यात आला होता. यात पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योत सिद्धूही सामील झाले. मार्चदरम्यान पंजाब काँग्रेस अध्यक्ष सुनील जाखड यांच्याशी बोलताना सिद्धू हसताना दिसून आले.

 

दु:ख पती अन् एकुलत्या एका मुलाला गमावण्याचे
आरती पती जितेंद्र अन् मुलगा शिवमसोबत विजयादशमी पाहायला गेली होती. ट्रेनखाली कटून पिता-पुत्राचा मृत्यू झाला, तर आरती जखमी झाली होती. उपचार सुरू असताना तिच्यापासून सत्य लपवून ठेवण्यात आले होते. सोमवारी तिला सर्वकाही सांगण्यात आले.

 

65 जणांचा गेला बळी, तरीही चेहऱ्यावर होते हास्य
नवज्योत सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर दसरा उत्सवात मुख्य अतिथी होत्या. त्यांच्या उपस्थितीत अनाउन्सर म्हणत होता- 'मैडम जी चाहे 500 ट्रेंने गुजर जाएं, ट्रैक पर खड़े लोगों को कोई फिक्र नहीं।' तरीही कौर यांनी लोकांना हटण्यासाठी नाही सांगितले. यानंतरच ही भीषण दुर्घटना झाली.

 

कसा झाला अपघात?
- शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात जोडा फाटकाजवळील धोबी घाटाजवळ झाला. संध्याकाळी 6.30 वाजता शेकडो लोक ट्रॅकवर उभे राहून रावण दहन पाहत होते. यादरम्यान पठाणकोट-अमृतसर डीएमयू आणि मग हावडा मेलने 250 जणांना चिरडले. यात 62 जण ठार झाले. उत्सवाच्या ठिकाणी तब्बल 4000 लोक उपस्थित होते.
- मैदानात जागा कमी पडल्याने शेकडोंच्या संख्येने लोक रेल्वे रूळावर उभे होते. त्यादरम्यान 6.50 वाजता जालंधरकडून लाइन नंबर 3 वर डीएमयू भरधाव आली आणि लोकांना चिरडून पुढे निघून गेली. या अपघातातून लोक सावरत नाहीत, तोच दुसरीही रेल्वे आली. 

 

 

बातम्या आणखी आहेत...