आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतसरच्या \'त्या\' रेल्वे ड्रायव्हरने केली आत्महत्या? सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो, सुसाइड नोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - अमृतसर रेल्वे अपघातात मीडिया आणि लोकांच्या आरोपांना कंटाळून आणि मानसिक तणावातून त्या ट्रेन ड्रायव्हरने आत्महत्या केली अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. फेसबूक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपवर ड्रायव्हर अरविंद कुमारचा व्हिडिओ पसरवला जात आहे. यात गुलाबी रंगाच्या टीशर्टमध्ये एकाने व्यक्तीने पुलावर गळफास घेतला. तसेच त्याच्या शेजारी तपास करताना पोलिस दिसून येतात. या व्हिडिओसह काही फोटो शेअर करण्यात आले. त्यामध्ये चक्क सुसाइड नोट देखील दिसून येते. लोक ही पोस्ट जास्तीत-जास्त शेअर करून त्याच्या आत्महत्येसाठी मीडियाला दोष देत आहेत. मीडियावर येणाऱ्या बातम्यांमुळे त्याने मानसिक धक्क्यात टोकाचे पाऊल उचलले असे सांगितले जात आहे. 


समोर आले हे सत्य
एका प्रसिद्ध हिन्दी वेबसाइटच्या वृत्तानुसार, सोशल मीडियावर पसरवली जाणारी ही पोस्ट फेक आहे. मुळात त्या ट्रेनचा ड्रायव्हर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. पंजाब पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा ही न्यूज फेक ठरवली आहे. अरविंद कुमार अजुनही पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यामुळे, त्याने आत्महत्या केली ही पोस्ट खोटी आहे. अरविंद कुमारच्या नावे लोक दुसऱ्या एका आत्महत्येच्या प्रकरणाच व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करत आहेत. त्याचा अरविंद कुमार किंवा अमृतसर रेल्वे अपघाताशी काहीही संबंध नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...