आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे विभागाची ठाम भूमिका : चालकाची चूक नाही, तपास करणार नाही; अज्ञात लोकांवर हत्येचा गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र शिवपुरी दुर्गयाना स्मशानभूमीतील आहे. येथे शनिवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत दुर्घटनेतील मृतांवर सामुदायिक अंत्यसंस्कार करण्यात आले. ३० हून अधिक लोकांवर अग्निसंस्कार करण्यात आले. सरणासाठी लाकडांचा तुटवडा होता. - Divya Marathi
छायाचित्र शिवपुरी दुर्गयाना स्मशानभूमीतील आहे. येथे शनिवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत दुर्घटनेतील मृतांवर सामुदायिक अंत्यसंस्कार करण्यात आले. ३० हून अधिक लोकांवर अग्निसंस्कार करण्यात आले. सरणासाठी लाकडांचा तुटवडा होता.

अमृतसर - पंजाबच्या अमृतसरमध्ये रावण दहनादरम्यान झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या ५९ वर पोहोचली आहे. १५० हून जास्त लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी अनेक कायमचे जायबंदी झाले आहेत. अपघाताच्या ४८ तासांनंतरही सरकार व प्रशासनाने त्याची जबाबदारी निश्चित करू शकले नाहीत. पंजाब सरकारने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. २८ दिवसांत त्याबद्दलचा अहवाल देण्याचे आदेश आहेत. पोलिसांनी आैपचारिकता म्हणून हत्या व दुर्घटनेशी संबंधित कलमे लागू केली आहेत. दुसरीकडे रेल्वे मंत्रालयाने लोकांना चिरडणाऱ्या रेल्वेच्या चालकाची चौकशी केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. रेल्वे राज्य मंत्री मनोज सिन्हा म्हणाले, यात चालकाची काहीही चूक नव्हती. रेल्वेच्या स्थानिक प्रशासनाने देखील रुळाजवळील आयोजनाची माहिती नव्हती, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर हे ट्रेसपासिंगचे प्रकरण आहे, असे सांगून रेल्वे सुरक्षा आयुक्त पातळीवरील तपास केला जाणार नाही, असे स्पष्ट केले. अशा प्रकरणी सीआरएस तपास होत नाही. रेल्वे संबंधित व्यक्तीच्या विरोधात कारवाई करू शकते. 


संतप्त गर्दीने फाटकावरील केबिनमॅनला खिडकीतून बाहेर फेकून दिले 
दुर्घटनेनंतर उपस्थित लोकांमध्ये शुक्रवारी रात्री संतापाची लाट उसळली होती. सअमृतसरच्या शिवालय रेल्वे क्रॉसिंगवर असलेल्या रेल्वेच्या केबिनची तोडफोड करण्यात आली. केबिनमॅनला बाहेर फेकण्यात आले. त्यामुळे केबिनमॅन जखमी झाला आहे. संतप्त जमावाने केबिनचे काच, रेल्वेची उपकरणे यांचीही तोडफोड केली. गेटमन अलर्ट असता ते हे घडले नसते, असे लोक म्हणतात. 


37 रेल्वेगाड्या ठप्प 
दुर्घटनेमुळे शनिवारी सकाळपासून रेल्वे गाड्या धावू शकल्या नाहीत. ३० हून जास्त गाड्या ठप्प असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. अमृतसरसह अनेक शहरांत प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. 


चालक म्हणाला - अंधारामुळे लोक दिसलेच नाहीत 
रेल्वे व पंजाब पोलिसांनी या दुर्घटनेप्रकणी चौकशी केली. घटनास्थळी अंधार होता आणि रुळावर वळण होते. त्यामुळे रुळावर बसलेले लोक दिसू शकले नाही. 

बातम्या आणखी आहेत...