आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

59 बळींचे गुन्हेगार कोण? रेल्वेखाली चिरडून लोक ठार झाल्याच्या दुर्घटनेनंतर मोठा प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - दसऱ्याला अमृतसरमध्ये रेल्वेखाली चिरडून ५९ लोक मारले गेले. ५७ जखमी झाले. मात्र, २४ तास उलटूनही याची जबाबदारी कुणीच घ्यायला तयार नाही. रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्विनी लोहानी म्हणाले, 'रेल्वेला रावणदहनाची माहितीच नव्हती. आमची चूक नाही.' महापालिका आयुक्त सोनाली गिरी यांनी आयोजनासाठी कुणाचा साधा अर्जही नव्हता, असे सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी विभागीय आयुक्तांना महिन्यात अहवाल मागितला आहे. मंत्र्यांची चौकशी समितीही नेमली जाईल. जीआरपीने अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कॅबिनेट मंत्री नवज्योत सिद्धू हे पत्नी नवज्योत कौरच्या बचावासाठी सरसावले. ते म्हणाले, 'ही घटना एक नैसर्गिक आपत्ती आहे.' मात्र, या घटनेतील सत्य एका व्हिडिओतून स्पष्ट होते. व्यासपीठावर नवज्योत कौरचा गुणगौरव सुरू होता. उद््घोषक म्हणाला, 'मॅडम, इकडे पाहा. भले ५०० रेल्वे येऊ द्यात... या लोकांना चिंता नाही. रुळावर ५ हजारांवर लोक आहेत.' यावर नवज्योतही हसल्या. काही वेळाने त्यांनी पुतळ्याला अग्नी दिला. इतक्यात अप-डाऊन दोन्ही रेल्वे आल्या आणि ५ सेकंदांत ५९ मृतदेह विखुरले. 


अनेकांचे जीव वाचवून 'रावण' गेला... रावणाची भूमिका करणाऱ्या दलबीरसिंगचाही मृत्यू 
नवरात्रात विविध कार्यक्रमांमध्ये रावणाची भूमिका सक्षमपणे साकारणारे दलबीरसिंग (३२) हे पण रेल्वेखाली चिरडून ठार झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी अनेकांना वाचवले. शेवटच्या दिवशी आपला पेहराव घरी ठेवून ते रावणदहन पाहण्यासाठी आले होते. त्यांनी रेल्वे येताना पाहिली आणि लोकांना रुळावरून बाजूला होण्यास सांगितले. मात्र, आतषबाजीत कुणाला ऐकू जात नव्हते म्हणून ते रुळाच्या दिशेने पळाले. अनेकांना ओढून त्यांनी प्राण वाचवले. मात्र, दुसऱ्या रेल्वेखाली ते स्वत:च चिरडले गेले. 

बातम्या आणखी आहेत...