'आम्ही तर दिवे / 'आम्ही तर दिवे विकत आहोत कोणी घेतच नाहीये काका..हे बोल ऐकून पोलिसही झाले भावुक..

Nov 10,2018 04:34:00 PM IST

नॅशनल डेस्क- निष्ठुर मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशमधील पोलिसांचा मानवी चेहरा दिवाळी निमित्त सर्वांसमोर आला. उत्तर प्रदेश येथील अमरोहा भागात दिवे विकणाऱ्या मुलांना त्यांनी मदत करून अनेकांची माने जिंकली. त्याचे फोटोज देखील सोशल मीडियावर ठिकठिकाणी व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये दोन लहान मुले मातीपासून बनविलेले दिवे विकतांन आणि त्यांच्या समोर उभे पोलिस आपल्याला दिसतात. हा फोटो एका युझरने त्याच्या फेसबुक वॉल वरून शेअर केला होता.त्यानंतर तो सर्वांसमोर आला आणि लोकांनी त्यांचे तोंडभर कौतुकही केले. सर्वांत आधी हे वृत्त भास्कर डॉट कॉम. ने आपल्या संकेतस्थाळावर पब्लिश केले होते. या पोस्ट मुळे फक्त फेसबुक पेज वर एका दिवसात जवळपास एक लाखांहून अधिक लाईक्स आणि 11 हजारांपेक्षाही अधिक शेअर मिळाले होते.

काय लिहले होते यूझरने ...
एका यूझर ने आपल्या वॉल वर लिहले - दिवाळी निमित्त सजलेल्या बाजारपेठेत परवाने तपासात दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलीसांची एक तुकडी बाजार पेठेत येते जिचे नेतृत्व नीरज कुमार करत असतात. सर्व दुकानदारांना आपली दुकाने व्यवस्थित अखत्यारीत भागात लावण्या संदर्भात त्यांना ते सूचना देत असतात.तेवढ्यात त्यांची नजर दोन मुलांकडे जाते.

जे जमिनीवर बसून गिऱ्हाईक येण्याची वाट पाहत बसलेले असतात. सर्वांनाच पोलिसांना पाहून असे वाटते की, त्या बिचाऱ्या मुलांना आता ते तेथून हुसकावून लावतात की काय? सकाळपासून त्यांचे दिवे विकलेही गेले नाही तोच त्यांना आता येथून रस्त्यात बसण्याच्या कारणावरून हुसकावून दिले जाईल.

पोलिसांना मुले म्हणाली आम्ही गरीब आहोत साहेब दिवाळी कशी साजरी करणार ...

नीराज कुमार मुलांजवळ जातात त्यांना त्यांचे नाव विचारतात. घरच्यां विषयी विचारपूस करतात . मुले अगदी केविलवाणे तोंड करून त्यांना म्हणतात आम्ही तर दिवे विकत आहोत पण कोणी खरेदी करायला येतच नाहीये. जेंव्हा दिवे विकले जातील आम्ही येथून लगेच निघून जावू. काका,आम्ही खूप वेळेपासून येथे बसलो आहोत हो पण कोणी आमच्याकडून विकतच घेतच नाहीये आमचे दिवे, आम्ही तर गरीब आहोत दिवे विकले गेले नाही तर आम्ही दिवाळी देखील साजरी नाही करू शकत. मुलांचे त्यावेळचे वर्णन शब्दात करणे अशक्य आहे. त्यातून त्यांना केवळ काही पैशांचीच अशा होती जेणेकरून मिळणाऱ्या मिळकतीतून ते दिवाळी साजरी करू शकतील.

नीरज कुमार म्हणाले आम्ही खरेदी करतो सर्व दिवे...

नीरज कुमार मुलांना म्हणाले काय आहे दिव्यांची किंमत मला विकत घ्यायचे आहेत सांगा त्यांनी दिवे विकत घेतले. त्यांच्याबरोबर सर्व सहकाऱ्यांनी देखील मुलांकडून दिवे विकत घेतले आणि नीरज कुमार स्वतः त्यांच्या बाजूला येऊन थांबले. येणाऱ्या जाणाऱ्यांना दिवे खरेदी करण्यास सांगू लागले. काही वेळातच त्यांनी मुलांचे सर्व दिवे विकून दिले. जसे जसे मुलांचे दिवे विकले जावू लागले तसे तसे मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित होत होता. त्यांचे सर्व दिवे विकल्यानंतर नीराजकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलांना दिवाळीची भेट म्हणून आणखी पैसे देखील दिले. पोलिसांच्या लहानशा मदतीने. मुलांची दिवाली खऱ्या अर्थाने हॅपी ठरली घरी गेल्यांनंतर किती आनंदी झाले असतील मुले याचा आपण अंदाजही नाही लावू शकत.

X