आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वर्क इन प्रोग्रेस'च्या एकाच उत्तराने आमदार झाले संतप्त, 'अमृत'च्या आढावा बैठकीत कंत्राटदाराच्या प्रतिनिधीचे उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अमरावतीकरांना मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी शासनाने मंजूर केलेल्या ११४ कोटींपैकी ८३ कोटी रुपयांचे काम मजिप्राने आडके नामक कंत्राटदाराला दिले आहे. कंत्राटदाराने हे काम मुदतीत १० ऑक्टोबर २०१८ पर्यंत पूर्ण न केल्याने मजिप्राने पुन्हा अडीच महीने मुदतवाढ दिली. दरम्यान, मागील तीन महिन्यांतील कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी शनिवारी बैठक घेतली. मात्र या बैठकीत आमदारांनी अपूर्ण कामाबाबत विचारलेल्या कोणत्याही प्रश्नावर कंत्राटदाराचे प्रतिनिधी सर, 'वर्क इन प्रोग्रेस', ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करतो,असे एकच उत्तर द्यायचे. वारंवार येणाऱ्या या एकाच उत्तरामुळे आमदार डॉ. देशमुख चांगलेच संतप्त झाले होते. दरम्यान, जे काम दोन वर्ष २ महिन्यांत पूर्ण केले नाही ते येत्या चाळीस दिवसांत कसे पूर्ण करणार, हा साधा प्रश्नही विचारण्याचे धाडस मजिप्राच्या एकाही अधिकाऱ्याने दाखवले नाही. कंत्राटदाराची दिरंगाई व मजिप्राच्या काही अधिकाऱ्यांच्या कचखाऊ भूमिकेमुळे मुदत संपल्यावरही ६० ते ७० टक्के काम झाले आहे.बैठकीला उपकार्यकारी अभियंता बक्षी, उपविभागीय अधिकारी किशोर रघुवंशी,मस्करे,सहायक अभियंता अविनाशे, काही उपकंत्राटदार उपस्थित होते. 

 

दीड वर्षांपासून गोंधळ, तातडीने पूर्ण करा काम 
बैठकीत कंत्राटदाराच्या प्रतिनिधींनी आम्हाला मजिप्राचे अधिकारी लिस्ट देत नाही, टेस्टिंगसाठी वेळेवर हजर राहत नाहीत,असे सांगितले. त्यावर लिस्ट दिली आहे, काहीही सांगू नका,असे मजिप्राचे अधिकारी म्हणाले. हा सगळा प्रकार पाहून आमदार देेशमुख चिडून म्हणाले, दीड वर्षांपासून तुमचा हा गोंधळच सुरू आहे, तो थांबवा आणि काम कसे पूर्ण करता येईल त्यावर लक्ष द्या. 

 

उपकंत्राटदार उग्र आंदोलनाच्या तयारीत 
नियम पायदळी तुडवून मुख्य कंत्राटदाराने शहरात अनेक उपकंत्राटदार नेमले, यापैकी काही कंत्राटदारांची देयकाची रक्कम मुख्य कंत्राटदाराने थकीत ठेवली म्हणून त्या उपकंत्राटदारांनी दिवाळीपूर्वी आडकेच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. त्यानंतर उपकंत्राटदारांसोबत चर्चा करून देयक देतो, असे सांगितले. अजूनही थकीत देयकाची पूर्ण रक्कम मिळाली नाही. ते उपकंत्राटदार आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

बातम्या आणखी आहेत...