आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस वादाच्या भोवऱ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणाल्या 'राष्ट्रपिता'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नव्या वादात अडकल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा देताना, त्यांचा उल्लेख "राष्ट्रपिता" असा केला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरावरुन टीका होत आहे. राष्ट्रपिता म्हटल्यावर फक्त महात्मा गांधींचे नाव समोर येत, पण अमृता फडणवीस यांनी मोदींचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केल्याने टीका होत आहे.काय म्हणाल्या अमृता फडणवीस ?
अमृता फडणवीस यांनी ट्विट केले की, "आपल्या देशाचे पिता नरेंद्र मोदीजी, जे समाजाच्या कल्याणासाठी खूप परिश्रम घेण्याची प्रेरणा देतात त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा." त्यांनी या ट्विटसोबत त्यांच्या आवाजातील "ओ रे मनवा तू तो बावरा है", हे स्वत:च्या आवाजात गायलेलं गाणे ट्विट केले आहे.