आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूझवरील सेल्फीमुळे ट्रोल होणाऱ्या मिसेस सीएम झळकल्या Femina च्या कव्हरपेजवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मिसेस सीएम अमृता फडणवीस सध्या चर्चेत आहेत. त्यामागचे कारण म्हणजे अंग्रिया नावाच्या क्रुझवर त्यांनी घेतलेला सेल्फी. या सेल्फीमुळे त्या सोशल मीडियावर चांग्ल्याच ट्रोल होत आहेत. पण मिसेस फडणवीस नुकत्याच एका प्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हर पेजवरही झळकल्या आहेत. हे कव्हर पेज आहे फेमिना मॅगझिनचे. 


फेमिना मॅगझिनच्या महाराष्ट्र स्पेशल एडिशनच्या ऑक्टोबर इश्यूच्या कव्हरपेजवर अमृता फडणवीस झळकल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच हे मॅगझिन प्रकाशित झाले आहे. पण सोशल मीडियावर सध्या त्यांचा हा फोटोदेखिल चांगलाच चर्चेत आहे. अमृता फडणवीस या विविध कार्यक्रमांमधून नेहमीच प्रकाशझोतात असतात. त्यात त्यांना गायनाची आवड आहे. त्यांचे काही अल्बम्सदेखिल रिलीज झाले आहेत. त्यापैकी एक अल्बम खुद्द बिग बी अमिताश बच्चन यांच्याबरोबरच आहे. तसेच अनेक सामाजिक कार्यक्रमांतही त्या उपस्थित असतात. फेमिनाच्या या कव्हरवर झळकल्यानंतर त्यांचे ग्लॅमर इंडस्ट्रीतील अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...