National / अहमदाबामधील अम्यूझमेंट पार्कमधील झोपाळा तुटल्याने तिघांचा मृत्यू तर 15 जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

अपघातानंतर तत्काळ अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल

दिव्य मराठी वेब

Jul 14,2019 08:29:31 PM IST

अहमदाबाद(गुजरात)- हिमाचलमध्ये इमारत कोसळल्याची घटना ताजी असतानाच आता गुजरातच्या अहमदाबादमध्ये एक मोठा अपघात घडला आहे. अहमदाबादच्या कांकरिया अम्यूझमेंट पार्कमध्ये झोपाळा तुटल्याने तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच अनेकजण गंभीर जखमीही झाले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा अपघात झोपाळा तुटल्याने झाला. यात आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी असल्याची माहिती आहे. अपघातानंतर तत्काळ अग्नीशमन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे आणि सध्या बचावकार्य सुरू आहे. जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण, दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

आज(14 जुलै) रविवार असल्याने या अम्यूझमेंट पार्कमध्ये लोकांची मोठी गर्दी होती. अनेकजण याठिकाणी मौजमजा करण्यासाठी आलेले होते. मात्र, त्याचवेळी झोपाळा तुटला आणि ही मोठी दुर्घटना घडली.

X
COMMENT