आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिममध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अक्षय कुमारची अभिनेत्री, फिटनेसची घेत आहे पूर्ण काळजी, लग्नाअगोदरच झाली प्रेग्नन्ट, एका कारणामुळे टाळले लग्न 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : फिल्म 'सिंग इज ब्लिंग' मध्ये अक्षय कुमारची अभिनेत्री एमी जॅक्सन पुन्हा एकदा आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत आहे. एमी लग्नाआधीच प्रेग्नन्ट झाली आहे आणि यादरम्यान ती ती आपल्या तब्येतीची खूप काळजी घेत आहे. तिने बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. हा फोटो जिममध्ये वर्कआउट सेशनच्या दरम्यानचा आहे. एमी आपला लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड आणि ब्रिटिशचा मल्टी मिलेनियर जॉर्ज पानायियोटौसोबत याचवर्षी ग्रीसमध्ये लग्न करणार होती. पण लग्न पोस्टपोन झाले. आता हे कपल यावर्षी नाही तर पुढच्यावर्षी म्हणजेच 2020 ला लग्न करेल. रिपोर्ट्सनुसार एमी, जॉर्जसोबत ग्रीसमध्ये बीच साइडवर ट्रेडिशनल वेडिंग करेल आणि वेडिंगसाठी एक सुंदर बीच सर्च करण्यासाठी त्यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले आहे.  

1 जानेवारीला झाला होता साखरपुडा...
- याचवर्षी 1 जानेवारीला कपलने साखरपुडा केला. एमीने भावी पतीसोबतचे फोटोज शेयर केले आहे. ज्यामध्ये ती जॉर्जसोबत आपली डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना दिसत होती.

- एमी आणि तिचा बॉयफ्रेंड जॉर्ज यांची भेट 2015 मध्ये एका फ्रेंडद्वारे लंडनमध्ये झाली. तेव्हापासूनच हे कपल एकमेकांना डेट करत आहे. जॉर्ज रियल स्टेट टायकून एंड्रियास पानायियोटौ यांचा मुलगा आहे. तसेच त्याचे स्वतःचे एक एक्सपेन्सिव नाइटक्लब Queens’s City देखील आहे.

जॉर्जच्याआगोदर याच्यासोबत केला होता साखरपुडा... 
जॉर्जच्याअगोदर एमी पॉलीटीशियन आणि अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर याला डेट करत होती. दोघांचा साखरपुडाही झाला होता. एवढेच काय तर एमी-प्रतीक यांचे रिलेशनशिप लग्नाच्या फार जवळ पोहोचले होते. मात्र, काही कारणांमुळे हे कपल वेगळे झाले.

सलमान खानसोबतही जोडले गेले होते नाव... 
- एमीचे नाव सलमान खानसोबतही जोडले गेले होते. 2017 मध्ये जेव्हा रजनीकांत स्टारर फिल्म 2.0 चा फर्स्ट लुक लॉन्च झाला होता तेव्हा सलमान न बोलावताच तिथे पोहोचला होता. त्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्याच्या आणि एमी जॅक्सनमध्ये काहीतरी आहे अशी चर्चा होऊ लागली. पण या सर्व बातम्यांचे खंडन करत एमीने सफाई दिली होती.

- एमीने एका मॅगजीन कव्हर लॉन्चमध्ये सांगितले, "सलमान खानला डेट करण्याची इच्छा कोणाची नसेल, पण मी सिंगल आहे आणि कुणालाच डेट करत नाहीये. मला सलमान खानसोबत काम करायला आवडेल, तो माझ्या लिस्टमध्ये टॉपवर आहे".

- 2017 मधेही सलमानचा भाऊ सोहेल खान याची फिल्म 'फ्रीकी अली' च्या प्रमोशनवर त्याची आणि एमीची केमिस्ट्री चर्चेचा विषय बनली होती. इव्हेंटचे अनेक फोटोज व्हायरल झाले होते, ज्यामध्ये सलमान एमीला हग करताना आणि तिच्यासोबत पोज देताना दिसत आहे. याव्यतिरिक्त सलमानच्या अनेक पार्टीजमध्येही एमी सामील झाली आहे. त्यामुळेच दोघांचे काहीतरी असल्याची चर्चा होती.

सूरज पंचोलीसोबतही जोडले गेले होते नाव... 
एमीचे नाव आदित्य पंचोली यांचा मुलगा आणि अभिनेता सूरज पांचोली यांच्यासोबतही जोडले गेले होते. सूत्रांनुसार, जिया खाननंतर सूरज एमीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे दिसले होते. एवढेच नाही एमी वांद्र्याच्या एक नवीन अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली होती, जेथून सूरजचे घर खूप जवळ होते.