आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मेंटल है क्या'मध्ये राजकुमारच्या पत्नीची भूमिका साकारणार अमायरा दस्तूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमायरा दस्तूर सध्या 'मेंटल है क्या' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती राजकुमार रावच्या पत्नीची भूमिका करत असल्याचे तिने या मुलाखतीत सांगितले. अमायराने सांगितले...,'राजकुमारसोबत काम करण्याचा अनुभव चांगला होता, तर कंगना रनोटच्या तोंडून माझे कौतुक ऐकून चांगले वाटले. इतका आनंद झाला की मी माझे संवाद विसरले होते.' 


साक्षी खन्नासोबत रिलेशनशिपमध्ये होती अमायरा दस्तूर 
अमायराविषयी आणखी एक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे अमायरा दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या साक्षी खन्ना या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मागील तीन वर्षांपासून याची चर्चा होती. 'द ट्रिप 2' वेब सिरीजच्या प्रमोशनवेळी तिने एका प्रश्नाच्या उत्तरात कुणालाच डेट करत नसल्याचे सांगितले होते. आता मला एकटेच राहायचे आहे, आता नात्याचा सामना करून शकत नाही, असे ती म्हणाली होती. 

बातम्या आणखी आहेत...