Home | Business | Gadget | Amzon smart echo show available in indian market

अमेझाॅनचा स्मार्ट इकाे शाे बाजारात दाखल, ८ मायक्राेफाेनची सुविधा; देशभरात विक्री सुरू

वृत्तसंस्था | Update - Apr 03, 2019, 10:51 AM IST

व्हिडिओ बघताना कॅब बुक करणे शक्य, यासारखे इतरही अनेक फीचर्स, किंमत २२,९९९रु

 • Amzon smart echo show available in indian market

  नवी दिल्ली - भारतात आपल्या हार्डवेअरची श्रेणी वाढवण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमेझाॅन या कंपनीने स्मार्ट डिस्प्ले इकाे शाे बाजारात दाखल केला आहे. दहा इंच आकार असलेला हा स्मार्ट डिस्प्ले डाॅल्बी साउंडसाठी अनुकूल आहे. या डिस्प्लेची मंगळवारपासून देशभरात विक्री सुरू झाली आहे. अमेझाॅनच्या संकेतस्थळावर तसेच काही निवडक दुकानांममध्ये हा डिस्प्ले खरेदी करता येऊ शकेल. कंपनीने या लाँचिंगच्या निमित्ताने ग्राहकांन फिलिप्स ह्यू स्मार्ट लाइट बल्ब माेफत देणार आहेे. सिटीबँक क्रेडिट, डेबिट कार्डवर या डिस्प्लेचे बुकिंग केल्यास दाेन हजार रुपयांची कॅशबॅक सुविधा कंपनीने दिली आहे. या डिस्प्लेच्या मदतीने एलेक्सा व्हाॅइस असिस्टंटचा वापर करून व्हिडिओ कंटेंटवरदेखील काम करता येते. व्हिडिओ काॅलिंगसाठीदेखील याचा उपयाेग करता येऊ शकताे. या उपकरणामध्ये आठ मायक्राेफाेन लावण्यात आले आहेत. त्याचबराेबर हाेम सर्व्हायव्हलन्सची सुविधादेखील यात आहे.

  व्हिडिओ बघताना कॅब बुक करणे शक्य
  > यामध्ये ५ मेगापिक्सेल कॅमेरा असून त्याद्वारे व्हिडिओ काॅलिंग करता येते
  > अमेझाॅन प्राइम व्हिडिओबराेबरच फेसबुक फाेटाे, मूव्ही ट्रेलर, व्हिडिअाे न्यूजचा आनंद
  > ऑनलाइन शाॅपिंग, कॅब बुक करणे, ताज्या बातम्या, पाककृती शिकण्यासाठी उपयाेग
  > गाणे ऐकण्यासाठी इकाे, इकाे डाॅट आणि इकाे प्लस स्पीकर सिस्टिम

Trending