आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहैदराबाद : हैदराबादच्या 8 वर्षांच्या पीडीव्ही सहरुदाने शनिवारी दोन वर्ल्ड रेकॉर्ड्स बनवले. सहरुदाचा या रेकॉर्डला एलीट वर्ल्ड रेकॉर्ड्स एलएलसी यूएसएने मान्यता दिली आहे. सहरुदाने 20 मिनिटांमध्येच 102 ऑरिगेमी मॉडल बनवले आणि एवढ्या वेळेतच 350 सिरेमिक टाइल्स तोडल्या. यापूर्वी हा रेकॉर्ड नॉर्थ कोरियाच्या एका महिला खेळाडूच्या नावे होता, जिने 20 मिनिटांमध्ये 262 टाइल्स तोडल्या.
सहरुदानुसार, 'मी तीन विश्व रेकॉर्ड बनवण्याचा प्रयत्न करत होते, पण केवळ दोनच बनवू शकले. मी अनेक राष्ट्रीय रेकॉर्ड मोडले. मागच्या एका वर्षापासून कराटे शिकत आहे आणि आतापर्यंत ग्रीन बेल्ट मिळवले आहे. सिरॅमिक टाइलच्या इव्हेंटसाठी मी माझ्या ट्रेनरसोबत 5 मिलीमीटर मोटी टाइल तोडण्याची प्रॅक्टिस करत होते.
मुली आणि महिलांना ट्रेंड करणे आहे उद्देश्य...
सहरुदाची ट्रेनर अश्विनी आनंदने सांगितले, 'मी 2017 च्या डब्ल्यूकेयू वर्ल्ड चॅम्पियनमध्ये सेकंड डिग्री ब्लॅक बेल्ट मिळवले आहे. माझा उद्देश्य जास्तीत जास्त मुली आणि महिलांना ट्रेंड करण्याचा आहे. सहरुदाची आता सुरुवातच झाली आहे. सहरुदा विश्व चॅम्पियनशिप आणि दुसऱ्या स्पर्धेंसाठी ती तयारी करत आहेत. आशा आहे, येणाऱ्या काळात सेल्फ डिफेंस प्रत्येक मुलासाठी महत्वपूर्ण असेल.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.