आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय वंशांच्या सामाजिक कार्यकर्तीने जेफ बेजोस यांच्या कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा केला प्रयत्न, म्हणाली मुक्या प्राण्यांची हत्या करणे बंद करा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लास वेगास - अमेरिकेत भारतीय वंशाच्या 'अॅनिमल अॅक्टव्हिस्ट' प्रिया साहनी (30) यांनी अॅमेझॉनचे सीईओ बेजोस यांच्यासमोर आपली बाजू त्यांच्या कार्यक्रमात मांडण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी लास वेगस मध्ये अॅमेझॉनची कॉन्फ्रेंसमध्ये बेजोस याचेय की-नोट सेशन सुरु होते. यादरम्यान प्रिया मंचावर पोहोचली आणि तुम्ही जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. तुम्ही प्राण्यांची मदत करायला हवी असे ओरडून सांगितले. 


प्रियाला ताब्यात घेण्यात आल्याची पुष्टि करण्यात आली नाही
प्रियाने सांगितले की, ती अॅमेझॉनच्या चिकन फार्मची अवस्था बघितली आहे. येथे पशुंवर अत्याचार होत आहेत. हे थांबवण्याची त्यांनी बेजोसला विनंती केली. दरम्यान सिक्योरिटी गार्ड्सनी प्रियाला अडवले आणि बाहेर घेऊन गेले. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी प्रियाला ताब्यात घेतल्याची पुष्टी केली नाही. प्रिया प्राण्यांसाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेटवर्क डायरेक्ट अॅक्शन एव्हरीव्हेअर (डीएक्सई) या संस्थेशी जोडलेली आहे. 2013 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये याची स्थापना झाली होती. 

 
रिपोर्टनुसार अॅमेझॉन प्रत्यक्षरित्या चिकन फार्म चालवत नाही तर पुरावठादारांकडून चिकनची खरेदी करताता. डीएक्सईच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी देखील अॅमेझॉनचा विरोध केला आहे.  

 

यापूर्वीही घडली अशी घटना

प्रियाने अशाप्रकारे बेजोसच्या कार्यक्रमात दखल देण्याची ही पहिली वेळ नाहीये. गेल्या महिन्यात अॅमेझॉनच्या भागीदारांच्या वार्षिक बैठकीत एका महिलेने थेट बेजोस यांच्याकडे प्रोडक्ट परत करण्याता प्रयत्न केला होता. 
 

बातम्या आणखी आहेत...