आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • An Army Officer Martyred In Fresh Firing From Pakistan On Loc, One Civilian Also Killed

पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात भारतीय लष्कराचे अधिकारी शहीद, एका महिलेचाही मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी बुधवारी गोळीबार केला. नियंत्रण रेषेजवळ झालेल्या या गोळीबारात भारतीय लष्कराचे अधिकारी शहीद झाले. सोबतच, एका महिलेचा देखील मृत्यू झाला. लष्करी सुत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांकडून बुधवारी सकाळपासूनच गोळीबार केला जात आहे. त्यास भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. तत्पूर्वी रविवारी सुद्धा पाकिस्तानी सैनिकांनी नौशेरा सेक्टरमध्ये आणि त्याही पूर्वी शनिवारी नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधी उल्लंघन केले होते.


गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. तंगधार आणि कंजलवाड परिसरात पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. 21 डिसेंबर रोजी राजौरी जिल्ह्यात केरी बटाल आणि सुंदरबनी सेक्टरमध्ये एलओसीवर पाकिस्तानकडून उखडी तोफा (मोर्टार) डागण्यात आल्या. त्यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या बॅट (बॉर्डर अॅक्शन टीम) ने फायरिंग केली होती. त्यामध्ये एक भारतीय जवान शहीद झाला. तसेच भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे दोन सैनिक मारले गेले. 5 ऑगस्ट रोजी जम्मू आणि काश्मीरमधून केंद्र सरकारने कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासूनच पाकिस्तानकडून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...