आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरली रात्र सारी माेजता तारे, अन् जळाली काही बाेटे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवनीत गुर्जर

समग्रतेला नाकारण्याचे अाणि केवळ तुकड्यांनाच वास्तव भासवण्याचे राजकारण स्वातंत्र्यापूर्वी हाेते अाणि अाजदेखील सुरू अाहे. सातत्याने अन्याय सहन करीत असलेल्या या लहानसहान गटांना नेते चिथावतात, त्यानंतर पाेकळ अाश्वासनांची अफू खाऊ घालतात. अखेर अतिवादाच्या मर्यादेपर्यंत त्यांना जाऊ देतात. त्यांच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत, त्यामुळे राज्यकारभाराचे सारे तंत्र अाणि अखेरीस साऱ्या देशालाच ते अन्यायपूर्ण ठरवू लागतात. एखाद्या सरकारला निकम्मा म्हणणे, म्हणजे शब्द वाया घालवण्यासारखेच, अाणि हे खरे अाहे. कारण सरकार शब्दातच सारी विशेेषणे गृहीत अाहेत.


अर्थातच, हे मुद्दे तुम्ही दिल्लीशी ताडून पाहू नका. तेथे अाता केवळ अफवाच अाहेत... बाकी काही नाही. कालच मला काेणीतरी विचारले की, या बाेटांना काय झाले? मी उत्तरलाे, काल रात्री तारे माेजता-माेजता कदाचित हाेरपळली असावीत. त्याचा विश्वासच बसेना. अाता अशी वेळच अाली अाहे की, सावलीत बसल्या-बसल्या तुम्ही जळू शकता; हे खरेच अाहे. दिल्लीतून येणाऱ्या अफवांना अाता मूठमाती द्या. जी दिल्ली मारेकऱ्यांना शिक्षा देण्याएेवजी खुद्द निर्भयाच्या अात्म्याला वारंवार फासावर लटकवत असेल तर त्याच्याशी काय बाेलावे? अाणि का बाेलावे? चला, माेदींविषयी बाेलूया... साेशल मीडियाचा त्याग करीत असल्याचे त्यांनी अलीकडेच सांगितले. नंतर म्हणाले की, अाता विचार बदलला अाहे. कदाचित लाेक काय प्रतिक्रिया देतील याचा ते अंदाज घेत असावेत. चर्चेत येण्यासाठी अशी नवनवीन तंत्रे अवलंबली जात असतात. उदा. अाॅटाेमाेबाइल कंपन्या किरकाेळ दुरुस्तीचे काम दाखवून ठरावीक काळात बाजारात अालेली वाहने परत मागवून घेतात. तात्पर्य, माेदींना साेशल मीडियाचा त्याग करायचा अाहे, परंतु लाेक त्यांना तसे करू देत नाहीत.

अाता काेराेना विषाणूकडे वळूया... दिल्लीत एक-दाेन रुग्ण अाढळले अाहेत. कदाचित विदेशात जाण्यावर बंदी येण्याची चिन्हे दिसत अाहेत. काही हरकत नाही, अाम्ही भारतीय काही ना काही पर्याय शाेधूनच काढताे. अनेक महिने पेट्राेलचे दर वाढवल्यानंतर अाता सरकारने काहीसे कमी केले अाहेत. काय गरज अाहे परदेश दाैऱ्याची. अापली गाडी काढा अाणि देशभर फिरा. पेट्राेल स्वस्तच अाहे की! अाता थाेडेसे राजकारणावर दृष्टिक्षेप टाकूया... छत्तीसगडमध्ये सतत अायकर खात्याकडून छापे घातले जात अाहेत. सरकारचे निकटवर्तीयही अपवाद ठरलेले नाहीत. परंतु अचानक हे धाडसत्र का? मध्य प्रदेशातील राजकीय घडामाेडींवरून लाेकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न तर यामागे नाही? असेही शक्य अाहे. दिग्विजय सिंह म्हणतात की, अामदारांचा घाेडेबाजार सुरू झाला अाहे. एकंदरीत मध्य प्रदेशच्या राजकारणात काही ना काही तरी शिजत अाहे. काय असावे, येत्या दाेन महिन्यांत समाेर येईल.

बातम्या आणखी आहेत...