आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, हल्लेखोर पसार, सीसीटीव्हीत दृश्य कैद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : मुकुंदवाडीत जुन्या वादातून एका टोळीने इलेक्ट्रॉनिक दुकानात घुसून २२ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर धुडगूस घालत शिवीगाळ करून हल्लेखोर पसार झाला आहे. त्यामुळे शनिवारी रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता. दंगा-काबू पथकाच्या एका तुकडीसह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 


मारहाणीमुळे बाजारपेठेत व्यावसायिकांची उडाली धांदल 
आनंद सुरेश डांगे (२५) असे जखमीचे नाव असून त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहे. शनिवारी सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास आनंद शिवाजी कॉलनीतील मुख्य रस्त्यावरील अभिषेक इलेक्ट्रिकल दुकानात बसलेला होता. त्यावेळी दहा ते पंधरा जणांचा गट दुकानासमोर येऊन धुडगूस घालत शिवीगाळ करून आनंदला बाहेर बोलावले. त्याच्यावर टोळीने सळई, रॉडने हल्ला चढवला. या मारहाणीमुळे बाजारपेठेत धांदल उडाली. व्यावसायिकांनी दुकाने बंद केली. हल्लेखोर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. 

 

 

वादाला राजकीय रंग :

आनंदवर हल्ला झाल्यानंतर सर्व हल्लेखोर पसार झाले आहेत. परंतु, सर्व आरोपी हे मुकुंदवाडीतील रहिवासी असल्याचे आनंदने पोलिसांना सांगितले. त्याच्या फिर्यादीवरून हल्लेखोरांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर या वादाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शुक्रवारी देखील या वादाशी संबंधित गटातील काही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी वाद घालत मारहाण केली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या वादाला वेगळे स्वरूप देण्याचा प्रयत्न करत शनिवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यामुळे तीन दिवसांपासून मुकुंदवाडीत तणावाचे वातावरण अाहे. तपास निरिक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक राहूल भदरगे करत आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...