आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वॉशिंगटन - अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाच्या ह्यूस्टन बेसवर अचानक एका अंतराळवीराच्या एमरजेंसी कॉलने एकच खळबळ उडाली. त्याने अंतराळातून सॅटेलाइट कॉल करून मदत मागितली होती. अंतराळातून स्वतःला किंवा पृथ्वीला कुठल्याही स्वरुपाचा धोका असल्यास स्पेस ट्रॅव्हेलर्सना एक विशिष्ट स्वरुपाचा नंबर दिलेला असतो. सॅटेलाइटच्या माध्यमातून कनेक्ट केल्या जाणाऱ्या या कॉलवर पृथ्वीवरील अख्खी यंत्रणा हलवावी लागते. नासाच्या बेसवर अशा स्वरुपाची विनंती आल्यानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. तेव्हा एका अंतराळवीराने चुकून हा नंबर डायल केल्याचे समोर आले.
नासाच्या जॉनसन स्पेस स्टेशनमध्ये अचानक अलार्म वाजण्यास सुरुवात झाली. कॉल येताच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर असलेल्या टीमला आदेश देण्यात आले. यानंतर पृथ्वीसह अंतराळातील टीम सुद्धा सक्रीय झाली. यानंतर नेदरलंडचे अॅस्ट्रोनॉट आंद्रे क्वीपर यांच्या हातून चुकून एमरजेंसी नंबर दाबला गेला असे समोर आले. अंतराळातून सॅटेलाइटच्या माध्यमातून अशा स्वरुपाचे कॉल करण्याची व्यवस्था आहे. यात फोन नंबरचे पहिले डिजीट 9 आणि त्यानंतर कोड 011 लावून कॉल करता येते. हालांकि, परंतु, गुरुत्वाकर्षण नसल्याने आंद्रे यांनी नंबर डायल करताना झीरो दाबलाच नाही. त्या ठिकाणी थेट 911 असा नंबर लावला.
911 अमेरिकेतील एमरजेंसी नंबर आहे. आंद्रेच्या कॉलनंतर नासातील अख्खी यंत्रणा हादरली होती. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये काही बिघाड झाला की काय असा प्रश्न सर्वांना पडला होता. यानंतर आयएसएसवरील टीमशी संवाद साधण्यात आला आणि वेळीच कॉलची चौकशी करण्यात आली. संपूर्ण स्पेस स्टेशनचे डायग्नोस्टिक स्कॅन केल्यानंतर काहीही बिघाड नाही असे कळवण्यात आले. क्वीपरने सांगितल्याप्रमाणे, आतापर्यंत सॅटेलाइटच्या माध्यमातून लावलेले 70 टक्के कॉल यशस्वी ठरतात. यापूर्वी 2015 मध्ये एका ब्रिटिश अंतराळवीराने चुकून एका महिलेला फोन कॉल लावला होता. त्यानंतर ट्वीट करून आपल्या चुकीची माफी देखील मागितली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.