आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन महिन्यांतील निर्णयांचे ऑडिट; महाविकास आघाडीच्या तुलनेत भाजप सरकार ठरले भारी

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • १३ मंत्रिमंडळ बैठकांत ठाकरे सरकारचे २४, तर फडणवीसांचे ११ बैठकांत २५ निर्णय
 • जुन्या निर्णयांना स्थगिती देण्यात ठाकरे सरकारची आघाडी

महेश जोशी  

औरंगाबाद - राज्यात तीन पक्षांनी स्थापन केलेले महाविकास आघाडीचे सरकार कामाला लागले असले तरी पूर्वीच्या फडणवीस सरकारच्या तुलनेत नवीन सरकारचा वेग कमी आहे. पहिल्या दोन महिन्यांत उद्धव सरकारने १३ मंत्रिमंडळ बैठकांत २४ निर्णय घेतले. त्यापैकी जुन्या सरकारच्या ४ निर्णयांना स्थगिती देण्यासंबंधीचे होते. फडणवीस सरकारमध्ये पहिल्या २ महिन्यांत ११ मंत्रिमंडळ बैठका झाल्या. त्यात २५ नवे कोरे निर्णय घेण्यात आले. जुन्या सरकारच्या निर्णयांना त्यात स्पर्शही नव्हता. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करत राज्यात सरकार स्थापन केले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे नेते म्हणून मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी झाला. त्यापूर्वी राज्यात शिवसेना-भाजप युतीचे महायुतीचे सरकार होते. महायुतीचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. पहिल्या दोन महिन्यांच्या कालावधीत दोन्ही सरकारच्या कामाचा वेग तपासण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने मंत्रिमंडळ बैठकांत घेतलेल्या निर्णयाचा आधार घेतला. मुख्यमंत्री सचिवालयातून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले असता ठाकरे सरकारचा वेग काहीसा कमी असल्याचे समोर आले.उद्धव सरकार (२८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जानेवारी २०२०)

महत्त्वाचे निर्णय

 • बैठक ४ : समृद्धी महामार्गाला अतिरिक्त ४५०० कोटींचे भागभांडवल
 • बैठक ८ : शिवभोजन, महात्मा जाेतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेस मान्यता
 • बैठक ११ : इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याची उंची वाढवणे
 • बैठक १२ : तान्हाजी करमुक्त

जुन्या निर्णयांना स्थगिती
 

 • बैठक १० : कृउबातील तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द
 • बैठक ११ : नपमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एकसदस्यीय प्रभाग पद्धत
 • बैठक १२ : नगराध्यक्षाची निवड पूर्वीप्रमाणे नगरसेेवकांतून होणार
 • बैठक १३ : सरपंचाची निवड पूर्वीप्रमाणे सदस्यांमधून होणार

फडणवीस सरकार (३१ ऑक्टो. २०१४ ते ३१ डिसें. २०१४)

महत्त्वाचे निर्णय
 

 • बैठक ५ : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या मदतीसाठी केंद्राला प्रस्ताव
 • बैठक ६ : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे ४००० कोटींचा प्रस्ताव
 • बैठक ६ : टंचाईग्रस्त गावांसाठी उपाययोजना
 • बैठक ६ : मराठवाडा, विदर्भ वैधानिक मंडळांना मुदतवाढ
 • बैठक ६ : राज्यात दोन नवीन फॉरेन्सिक लॅब
 • बैठक ९ : कृषी संजीवनी योजनेस मुदतवाढ
 • बैठक १० : नप, मनपात एकसदस्यीय प्रभाग पद्धतीचा अवलंब
 • बैठक १०-दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वीज बिलात सूट