दिव्य मराठी विशेष / ई-मेल व्यवस्थापनाची सुविधा देणारे अॅप करताहेत तुमच्या डेटाची चोरी, खरेदी आणि खर्चाच्या मेलवर असते नजर

  • एडिशन, क्लीनफॉक्स, स्लाइससारख्या ई-मेल प्रॉडक्टिव्हिटी अॅपवर आरोप
  • अॅप स्पेंडिंग बिहेविअरशी संबंधित डेटा विकून मोठी कमाई : मदरबोर्ड अहवाल

वृत्तसंस्था

Feb 13,2020 09:10:00 AM IST

नवी दिल्ली - तुम्ही तुमच्या ई-मेल अकाउंटचे व्यवस्थापन करण्यासाठी एखाद्या थर्ड पार्टी अॅपचा वापर करत असाल तर सावध राहा. या कामासाठी लावलेले अनेक अॅप युजरचा डेटा चोरून मार्केटमध्ये विकत आहेत. मदरबोर्डच्या ताज्या अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे. मदरबोर्डाने अनेक गोपनीय दस्तऐवज जमा केले. त्यात ज्या अॅपच्या नावाचा उल्लेख केला आहे त्यामध्ये एडिशन, क्लीनफॉक्स आणि स्लाइस प्रमुख आहेत. अहवालानुसार, हे अॅप सर्वसाधारणपणे तुमच्या सर्व ई-मेलवर लक्ष ठेवतात. मात्र, त्यांचे सर्वाधिक लक्ष खरेदीदारी आणि खर्चाशी संबंधित ई-मेलवर असते. तुम्ही कोणत्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी करता आणि त्यावर किती खर्च करता याकडे त्यांचे लक्ष असते. यानंतर तुमच्या खर्चाच्या पद्धतीशी संबंधित डेटा विकून मोठी कमाई केली जाते. फायनान्स, ट्रव्हल आणि ई-कॉमर्सशी संबंधित कंपन्या सर्वात मोठ्या ग्राहक असतात.


एक अन्य अमेरिकी मीडियानुसार, असे अॅप चालवणाऱ्या कंपन्या युजर्सच्या व्यावसायिक ईमेलवर लक्ष ठेवत असल्याचे मान्य करतात. एडिशनच्या प्रवक्त्याने एका एका मुलाखतीत सांगितले की, त्यांची कंपनी अशा एका सॉफ्टवेअरचा वापर करते जी स्वत:हून व्यावसायिक ई-मेल ट्रॅक करते आणि पुन्हा त्यातील खरेदीदारीशी संबंधित डेटा स्वतंत्र करते. मात्र, त्यांच्या दाव्यानुसार, युजर्सच्या वैयक्तिक आणि कामाशी संबंधित ई-मेलवर लक्ष ठेवले जात नाही. एडिशन अॅपल अॅप स्टोअरवर टॉप-१०० प्रोडक्टिव्हिटी अॅपमध्ये समाविष्ट आहे. स्लाइसची पॅरंट कंपनी राकुटेनशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, अॅपवर युजर्सला माहिती दिली जाती की, त्यांचा डेटा रिसर्चच्या उद्देशाने संकलित केला जातो. कंपनी युजर्सच्या खासगीपणाची काळजी घेते,असा त्यांचा दावा आहे. मदरबोर्डच्या अहवालानुसार, काही अॅप कंपन्या व्यावसायिक ई-मेलही ट्रॅक करतात.

इनबॉक्सच्या संयोजनाच्या बहाण्याने होते चोरी

बहुतांश ई-मेल अॅप तुमच्या इनबॉक्सच्या व्यवस्थापनात मदत करत असल्याचा दावा केला जातो. हे तुमची अनेक प्रकारची परवानगी घेतात. बहुतांश अॅप दावा करतात की, खासगी ई-मेल पाहत नाहीत, मात्र मदरबोर्डच्या अहवालानुसार बहुतांश अॅप संशयाच्या जाळ्यात आहेत.

X
COMMENT