आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • An Earthquake Measuring 6.8 On The Richter Scale In Elazig Turki, Kills 18 And Injures More Than 500

एलाजिग प्रांतात आलेल्या 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात 18 जणांचा मृत्यू तर 500 पेक्षा जास्त जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुर्कीत तीन दिवसांत दुसऱ्यांदा भूकंप, शेजारील तीन देशात जाणवले भूकंपाचे झटके

अंकारा- पूर्व तुर्कीत शुक्रवारी आलेल्या भूकंपात 18 जणांचा मृत्यू झाला तर 500 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या, त्यात अनेक लोक अडकल्याची माहिती आहे. भूकंपाची तीव्रता 6.8 रिश्टर स्केल इतकी होती. तुर्कीचे गृह मंत्री सुलेमान सोयलू यांनी सांगितले, भूकंपाचे केंद्र पूर्व तुर्कीमधील एलाजिग प्रांतातील सिवरिस आहे. जखमींमध्ये अनेकजण गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

यूएस जिओलॉजिकल सर्वेनुसार, भूकंप स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता झाला. भूकंपाचे क्षेत्र 10 किलोमीटरपेक्षाही जास्त पसरले आहे. रिपोर्ट्सनुसार, 40-40 सेकंदाच्या आत 60 झटके जाणवले. यानंतर घाबरलेले लोक आपापल्या घराबाहेर आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूकंप क्षेत्रात बचावकार्य सुरू आहे. भूकंपानंतर आफ्टरशॉकच्या संशयामुळे पडीक इमारतींजवळ जाण्यास बंदी घातली आहे. भूकंपाचे झटके तुर्कीच्या शेजारील देश इराण, सीरिया आणि लेबनानमध्येही जाणवले आहेत. या देशांमध्ये कोणतीही हानी झालेली नाही.

21 वर्षात भूकंपात 18 हजार लोकांचा मृत्यू

तुर्कीमध्ये सर्वात मोठा भूकंप 1999 मध्ये आला होता, तेव्हा 18 हजार जणांचा मृत्यू झाला होता. 10 वर्षांपूर्वी एलाजिगमध्ये 6 तीव्रतेचा भूंकपा आला होता, त्यात 51 जणांचा मृत्यू झाला होता. तुर्कीमध्ये 22 जानेवारीला भूंकप आला होता. मणिसा प्रांतातील कर्कगाक आणि अखीसर शहरात आलेल्या भूकंपाची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल इतकी होती.