Home | International | Other Country | An Economist Wins Lottery 14 Times With Clever Formula

अर्थशास्त्रज्ञाची कमाल, गणिताचे सिद्धांत वापरून 5 देशांत 14 वेळा जिंकली लॉटरी, अमेरिकेने लावले प्रतिबंध

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 31, 2018, 03:16 PM IST

रोमानियाचे एक अर्थशास्त्रज्ञ स्टीफन मेंडल यांनी 14 वेळा लॉटरी जिंकली. स्टीफन यांचे लॉटरी जिंकणे हा काही योगायोग नव्हता.

 • An Economist Wins Lottery 14 Times With Clever Formula
  स्टीफन यांनी लॉटरी जिंकण्यासाठी अल्गोरिदमने फॉर्म्युले बनवले.
  लॉटरी खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदार जमवले, मग कंपनीही बनवली.


  बुडापेस्ट - रोमानियाचे एक अर्थशास्त्रज्ञ स्टीफन मेंडल यांनी 14 वेळा लॉटरी जिंकली. स्टीफन यांचे लॉटरी जिंकणे हा काही योगायोग नव्हता. यासाठी त्यांनी गणितीय सिद्धांत वापरले. लॉटरी जिंकण्यासाठी स्टीफन यांनी अल्गोरिदमवर आधारित एक फॉर्म्युला बनवला. ज्याला कॉम्बिनेशनल कंडेंसेशन नाव दिले. याच्या मदतीने ते लॉटरीसाठी 5 ते 6 विनिंग नंबर काढण्यात यशस्वी व्हायचे.

  स्टीफन यांनी आपल्या 58 वर्षांच्या करिअरमध्ये रोमानिया, ऑस्ट्रेलिया, इस्रायल, ब्रिटन आणि अमेरिकेत लॉटरी खरेदी केली आणि जिंकलीसुद्धा. या परिसरात मिळालेल्या यशाने ते आणखी लोकप्रिय झाले. काही जणांनी त्यांच्यासोबत लॉटरीमध्ये पैसे गुंतवण्याची ऑफर दिली. त्यांना ही आयडिया भावली. नंतर त्यांनी याची कंपनी बनवली आणि गुंतवणूकदारही जमवले.

  सुरुवात कशी झाली:
  1960 मध्ये रोमानियामध्ये कम्युनिस्ट शासन होते. देशाची परिस्थिती ठीक नव्हती. उपासमारी वाढली होती. लोकांकडे नोकरी नव्हती. तेव्हा स्टीफन तरुण होते. नोकरी करत होते, परंतु एवढे पैसे मिळत नव्हते की, आपल्या कुटुंबाचा (दोन मुले आणि पत्नी) खर्च भागवू शकतील. त्या वेळी अनेक जण गुन्हेगारीकडे वळले, परंतु स्टीफन यांनी असे केले नाही. यानंतरच स्टीफन यांनी लॉटरीमध्ये काम करण्याची प्लॅनिंग केली. आधी रोमानियामध्ये नशीब आजमावले आणि मग ऑस्ट्रेलियाला गेले.

  लॉटरी जिंकण्याचे बनवले सॉफ्टवेअर:
  स्टीफन यांनी लॉटरीच्या विनिंग नंबरचे कॅल्कुलेशन करण्यासाठी एक सॉफ्टवेयर तयार केले. याच्या मदतीने ते संभावित विनिंग नंबरचे कॉम्बिनेशन तयार करण्यात यशस्वी ठरायचे. एक सिंगल कॉम्बिनेशन काढण्यासाठी ते 30 हून जास्त कॉम्प्यूटरचा वापर करायचे आणि या कामासाठी त्यांनी 16 जणांना नोकरीवरही ठेवले. गुंतवणूकदार आकर्षिक करण्यासाठी त्यांनी पॅसिफिक फाइनेंशियल रिसोर्सेस नावाची कंपनीही स्थापन केली. स्टीफन म्हणतात की, फॉर्मूलेच्या मदतीने ते मित्रांकडून पैसे घेऊन लॉटरीची अनेक तिकिटे घ्यायचे. एकदा लॉटरी जिंकल्यावर जवळजवळ 15 हजार पाउंड (14 लाख रुपये) एवढी रक्कम मिळायची. सर्व खर्च काढल्यानंतर 3 लाख रुपये उरायचे.

  जिब्राल्टरमध्ये फेल झाले:
  दरवेळी स्टीफन यांना नशिबाने साथ दिली नाही. जिब्राल्टरमध्येच ते लॉटरी सिस्टिम बनवण्यात अयशस्वी ठरले. इस्रायलमध्ये एक गुंतवणूक घोटाळा केल्याप्रकरणी स्टीफन यांना 20 वर्षांचा तुरुंगवासही झाला. अमेरिकेत लॉटरी जिंकण्यासाठी स्टीफन यांच्या फॉर्मूल्याच्या वापरावर प्रतिबंध लावण्यात आले आहे. एकदा स्टीफन यांनी एका वृत्तपत्राला म्हटले होते की, मी गणितीय योग्यतेच्या मदतीने जोखीम स्वीकारणारा माणूस आहे. पूर्ण काम कायद्यात राहूनच करतो.

Trending