आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ महिन्यांच्या मुलाची जन्मदात्याने खलबत्त्याने ठेचून केली हत्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - आठ महिन्यांचे मूल आपले नसल्याचा संशय व्यक्त करीत खलबत्त्याने प्रहार करीत पित्यानेच बालकाचा क्रूरपणे खून केल्याचा प्रकार रविवारी लातूरमध्ये घडला. तत्पूर्वी गेले काही दिवस त्याने मुलाच्या अंगावर गरम चहा ओतणे, पाय खेचणे, मुलाला चटके देणे असे प्रकार केेेेल्याचेही उघड झाले आहे.

लातूर शहरात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या सोमनाथ साळुंके (३०) याच्या पत्नीने आठ महिन्यांपूर्वी मुलाला जन्म दिला. स्वप्निल असे त्याचे नाव ठेवण्यात आले. मात्र सोमनाथ याने पहिल्या दिवसापासूनच या बाळाचा बाप आपण नसल्याची भाषा सुरू केली. पुढे-पुढे तर तो बाळाला चटके देणे, चिमटे घेणे, त्याचा पाय ओढणे, त्याला मारणे असे प्रकार करू लागला. त्याची समजूत काढूनही त्याचा संशय बळावत गेला. रविवारी त्याने क्रूरतेची सीमा गाठत स्वयंपाक घरातील खलबत्त्याने स्वप्निलच्या डोक्यावर आणि छातीवर वार केले.
चिमुकल्या स्वप्निलचा जागीच मृत्यू : स्वप्निलच्या आईच्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलिस स्टेशनमध्ये सोमनाथविरुद्ध गुन्हा दाखल केला. आठ महिन्यांच्या बाळाचा क्रूर पद्धतीने खून झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.