आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न करेन तर पीव्ही सिंधूशीच, तिने ऐकले नाही तर तिला पळवून आणीन - 70 वर्षीय वृद्धाचा आग्राह

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामनाथपुरम - चाहत्यांचे खेळाडूंप्रती असलेले प्रेमाचे अनेक किस्से समोर आले आहेत. पण एक व्यक्तीचे या खेळाडूवर असलेलेल्या प्रेमाबाबत जाणून तुम्हाला चकीत व्हाल. तामिळनाडूतील एका 70 वर्षीय वृद्धाने बॅडमिंटनची सुवर्णपदक विजेती पीव्ही सिंधूसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबतचे एक निवेदन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला. मल्यासामी असे या वृद्धाचे नाव आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज देताना तो म्हटला की, जर लग्नासाठी आवश्यक ती व्यवस्था न केल्यास मी सिंधूचे अपहरण करीन. 
 
वृत्तानुसार सार्वजनिक सुनावणीवेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या मल्यासामी यांनी बॅडमिंटन सुवर्णपदक विजेती पीव्ही सिंधू आणि स्वतःचा फोटो असलेले पत्र देताना जिल्हाधिकाऱ्यांकडे सिंधूशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. या दरम्यान त्याचे वय 70 वर्षे नसून 16 वर्षाचा असून माझा जन्म 4 एप्रिल 2004 रोजी झाला असल्याचा दावा केला. जिल्हाधिकारी कार्यालयाने मात्र त्याचा हा अर्ज फेटाळला. सोबतच या व्यक्तीची मानसिक संतुलन ठीक आहे की नाही याबाबत तपासणी करण्यात येणार आहे.