आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • An Elderly Woman Was Stuck In A Bathtub For 8 Days, She Lived By Drinking Tap Water

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

8 दिवस बाथटबमध्ये अडकलेली होती वयस्कर महिला, नळाचे पाणी पिऊन राहिली जिवंत 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

लीसेस्टरशायर : ब्रिटनमध्ये एक वयस्कर महिला आठ दिवस बाथटबमध्ये फसल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, फूड डिलीव्हरी बॉयच्या सांगण्यावरून घराची तपासणी केली गेली तेव्हा महिलेला रेस्क्यू केले गेले. असे सांगितले जात आहे की, महिला घरात एकटीच राहात होती. पोलिसांनी तिचे नाव सांगितले नाही. 


विल्टशायर फर्म फूडसाठी काम करणाऱ्या डिलीव्हरी बॉयने सांगितले, "वयस्कर महिला त्याची नियमित ग्राहक आहे, पण तिने मागच्या अनेक दिवसांपासून कोणतीही ऑर्डर दिली नव्हती. त्यामुळे मला संशय आला. मला वाटले महिलेसोबत काही अनपेक्षित घडले की काय." पोलिसांनी सांगितले हे प्रकरण मागच्या आठवड्यातील आहे. 

बाथटबमधून उठू शकत नव्हती महिला... 


पोलिसांनी सांगितले की, महिला खोल बाथटबमधून बाहेर पडू शकत नव्हती. तिची परस्थिती स्थिर होती, पण ती खूप भुकेली होती. आठ दिवस ती केवळ पाणी पिऊन जिवंत होती. पोलिसांनी तिला ताबडतोब रुग्णलयात दाखल केले. जिथे तिची अवस्था स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...