आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीमध्ये एका व्यक्तीला बुडताना पाहून हत्तीने वाचवले त्याचे प्राण, व्हिडिओ होत आहे व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : प्राण्यांचे अनेक व्हिडीओज फोटोज आपण पाहत असतो. प्राण्यांच्या हल्ल्यांविषयी त्यांच्या करामतींविषयीही वाचतो. पण सध्या जो एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्ही हैराण व्हाल. एका छोट्या हत्तीला नदीमध्ये एक व्यक्ती बुडताना दिसतो. ज्याला वाचवण्यासाठी तो हत्ती पाण्यात उतरतो आणि त्या व्यक्तीला किनाऱ्यावर आणून सोडतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका ट्विटर यूजरने शेअर केला आहे. यूजरने लिहिले, 'माझे मन रडत आहे, या छोट्या हत्तीला वाटले की, ती व्यक्ती बुडत आहे. हत्ती त्याला वाचवण्यासाठी नदीमध्ये उतरला. आपण वास्तविक त्यांच्या लायक नाही आहोत.'

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, हत्तीचा एक कळप नदीजवळून जात असतो. तेव्हा नदीमध्ये एक व्यक्ती पोहताना त्यांना दिसतो. पण त्यातील एका छोट्या हत्तीला वाटते तो माणूस बुडत आहे, तो हत्ती लगेच नदीमध्ये उतरतो आणि त्या व्यक्तीला नदीच्या काठावर आणून सोडतो. हत्तीला जवळ येताना पाहून तो व्यक्ती घाबरला आणि पोहत पोहत किनाऱ्याजवळ जाऊ लागला. पण त्याच्या अगोदर हत्ती पोहोचला आणि त्याने त्या व्यक्तीला पडकले. त्यानंतर तो व्यक्ती त्या हत्तीला धन्यवाद म्हणाला.  

बातम्या आणखी आहेत...