आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 हजार रूपयांतून सुरू केली अब्जावधींची कंपनी, पण एका ई-मेलमुळे बुडाले 12 हजार कोटी...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- या व्यक्तीने आपल्या वडिलांकडून फक्त 10 हजार रूपए उधार घेऊन बिझनेस सुरू केला होता, जो आता 32 वर्षांनंतर अब्जाबधींचा बिझनेस एम्पायर बनला आहे. शुक्रवारी फक्त एका ईमेलने कंपनीचे अंदाजे 12 हजार कोटी रूपए बुडाले आहेत. आम्ही देशातील सगळ्यात मोठी फार्मा कंपनी सन फार्मा (Sun Pharma) आणि त्याचे मालक दिलीप सांघवी बद्दल बोलत आहोत. जाणून घ्या पूर्ण गोष्ट...


वडिलांकडून 10 हजार रूपये उधार घेऊन सुरू केली होती कंपनी
दिलीप सांघवी एक असे व्यक्तीमत्व आहे, ज्यांनी मेहनतीच्या जोरावर अब्जावधींचे साम्राज्य तयार केले आहे. त्यात त्यांची फार्मा कंपनी सनफार्मा सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यांनी 32 वर्षांपूर्वी 1983 आपल्या वडिलांकडून 10,000 रूपये उधार घेऊन सन फार्माची सुरूवात केली होती. सुरूवातीला सन फार्माने फक्त 5 प्रोडक्टच बाजारात आणले होते, पण आज हीच कंपनी देशातील सगळ्यात मोठी फार्मा कंपनी आहे. याची मार्केट व्हॅल्यू 1 दिवसापूर्वी अंदाजे 1 लाख कोटी होती. गुजरातमध्ये 1955 मध्ये जन्मलेले सांघवी यांच्याकडे सन ग्रुपच्या तीन कंपनीमध्ये 63 टक्के भागीदारी आहे.

 

एका ईमेलने बुडाले 12 हजार कोटी
काही दिवसांपूर्वी सांघवी यांची कंपनी सन फार्मावर अनेक आर्थिक अनियमिततेचे आरोप लावण्यात आले. मार्केट रेग्युलेटर सेबी (SEBI) ला एक व्हिशलब्लोअरने एक नवीन तक्रार पाठवली. त्यानंतर कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांनी घसरले. त्यानंतर कंपनीची व्हॅल्यू 90 हजार कोटी रूपयांवर आली. सन फार्मावर कोणते आरोप लागले...

 

 सन फार्मावर हे आरोप लागले 
एका फाइनांशिअल वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, एक व्हिशलब्लोअरने सन फार्माविरूद्ध नवीन तक्रार सेबीला पाठवली. त्यात, वर्ष 2014 आणि 2017 तरम्यान आदित्य मेडिसेल्स आणि सन फार्माच्या प्रमोटर्सची प्रायवेट कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर ट्रांझॅक्शंस झाले होते. रिपोर्टनुसार, ‘एक व्हिशलब्लोअर द्वारे सन फार्माविरूद्ध मार्केट रेग्युलेटर सेबीला पाठवण्यात आलेल्या तक्रारीत आरोप लावले की, 2014 आणि 2017 दरम्यान फक्त तीन वर्षात आदित्य मेडिसेल्स (एएमएल)आणि सन फार्माचे को-प्रमोटर सुधीर वालियाचे कंट्रोल असलेली सुरक्षा रियल्टीसोबत 5800 कोटी रूपयांचे ट्रांझॅक्शन झाले आहे.
 

 
2 दिवसांत 18 हजार कोटी घसरली मार्केट व्हॅल्यू
या बातमीनंतर बीएसइ (BSE) मध्ये सन फार्माचा स्टॉक 12 टक्क्यीनी घसरला. मागच्या दोन ट्रेडिंग सेशंसबद्दल सांगायचे झाले तर कंपनीचे शेअर अंदाजे 17 टक्क्यांनी घसरले आहे. शेअरच्या 375 रूपयांच्या लो हिशोबाने कंपनीची मार्केट व्हॅल्यूमध्ये अंदाजे 12 हजार कोटी रूपय कमी दिसत आहेत. मागच्या दोन दिवसांत कंपनीची वॅल्युएशन अंदाजे 18,702 कोटी रूपयांनी घसरली आहे. या बातमीमुळे ग्रुपच्या इतर कंपन्या एसपीआरसी (सन फार्मा एडवांस्ड रिसर्च कंपनी) चे शेअर बीएसईवर 158 रूपयांसोबत 52 आठवड्यांच्या लोवर आले आहेत. 


 

 

बातम्या आणखी आहेत...