आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पेटरसन (न्यू जर्सी) - अमेरिकेत सध्या एका गायीची बातमी चांगलीच चर्चेत आहे. लोक त्याबाबत वाचून इमोशनल होत आहेत. काही दिवसांपूर्वी गायीला मारण्यासाठी कत्तलखान्यात नेले जात होते. पण कदाचित गायीला कदाचित आपल्याबरोबर काय होणार याची शंका आली असावी. त्यामुळे गायीने चालत्या ट्रकमधून उडी मारली. त्यानंतर प्राण्यांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेचे लोक तिला सोबत घेऊन गेले. त्याठिकाणी पोहोचल्याच्या दुसऱ्या दिवशी गायीने एका वासराला जन्म दिला. NGO ने दावा केला आहे की, गायीने तिच्या वासराचा जीव वाचवण्यासाठीच ट्रकमधून उडी मारली होती.
10 मिनिटांत वाचला जीव..
- ही स्टोरी 'ब्रिएना' नावाची एक गाय आणि तिचे वासरू 'विंटर' यांची आहे. विंटरचा जन्म जन्म 29 डिसेंबर 2018 रोजी न्यूजर्सीच्या वांटेज शहरात प्राण्यांसाठी काम करणारी NGO स्कायलँड्स अॅनिमल सँक्च्युरीमध्ये झाला.
- गायीची ही स्टोरी NGO ने त्यांच्या फेसबूक पेजवरही शेअर केली आहे. रेस्क्यू सेंटरला ही गाय 27 डिसेंबरला एकरा हायवेवर बेवारस अवस्थेत आढळली होती. ही गाय कत्तलखान्यात नेण्यात येत होती. त्याठिकाणी गायीला मारून तिच्या मांसाची विक्री करण्यात आली असती.
- NGO च्या मते गायीला तिच्याबरोबर काय होणार याची शंका आली होती. त्यामुळे तिचे आधीच ट्रकमधून उडी मारली. कत्तलखान्यापासून अवध्या 10 मिनिटांच्या अंतरावर गाय पडलेली आढळून आली होती.
डॉक्टर म्हणाले, कधीही आई बनू शकते
- NGO स्टाफने गायीला रेस्क्यू सेंटरमध्ये नेले तेव्हा तपासल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, ती कधीही आई बनू शकते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी गायीने एका सुंदर वासराला जन्म दिला. त्याचे नाव 'विंटर' ठेवण्यात आले.
- जवळपास 453 किलोच्या या गायीने पोटातील वासराला वाचवण्यासाठी 8 फूट उंचाच्या ट्रकवरून उडी मारली होती. रेस्क्यू सेंटरचे लोकही त्यामुळे आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी फेसबूकवर ही स्टोरी शेअर केली.
- ब्रिएना आणि विंटरची स्टोरी शेयर करताना स्कायलँड्स अॅनिमल सँक्चुरी आणि रेस्क्यू सेंटर, लोकांना असा अगणित गायी आणि बछड्यांना वाचवण्यासाठी लोकांना शाकाहारी बनण्याची विनंती करतक आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.