नवीन स्मार्टफाेनमधील चेहरा ओळखणारे लाॅक सुरक्षित नाही; फेशियल रिकग्निशनमधील त्रुटी आल्या समाेर

दिव्य मराठी

Apr 09,2019 10:28:00 AM IST

बीजिंग - स्मार्टफाेन उत्पादक कंपन्या चेहरा आेळखणारे लाॅक (फेशियल रिकग्निशन लाॅक) जास्त सुरक्षित असल्याचे सांगतात. या तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या स्मार्टफाेनची किंमत सर्वसाधारण स्मार्टफाेनच्या तुलनेत जास्त असते. परंतु हे तंत्रज्ञानदेखील पूर्णपणे सुरक्षित नाही. कारण चीनमध्ये एका झाेपलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा वापर करून जवळपास १.२५ लाख रुपयांची (१,८०० डाॅलर) चाेरी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. चीनच्या जेझियांग भागात युआन नावाच्या व्यक्तीने आपल्या बँक खात्यातून १,८०० डाॅलरची रक्कम गायब झाल्याची पाेलिसांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी तपास केल्यानंतर त्याच्याच सहकाऱ्यांनी फाेनमध्ये असलेल्या ‘व्ही-चॅट’ अॅपमधून फेशियल रिकग्निशनचा वापर करून रक्कम आपल्या खात्यात वळवली असल्याचे उघडकीला आले. या चाेरीसंदर्भात दाेघांना पाेलिसांनी अटक केली आणि युआनला त्याचे पैसे परत मिळाले. परंतु या पूर्ण प्रकरणानंतर ‘फेशियल रिकग्निशनबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाच्या चाैकशीशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, युआनच्या माेबाइलमध्ये असलेले फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञान विश्वसनीय नव्हते असे वाटते. व्यक्तीचे डाेळे बंद असले तरीही त्याच्या चेहऱ्याचा वापर करून फाेन अनलाॅक करता येऊ शकताे, असे आम्ही केलेल्या चाचणीत दिसून आले.

आजच्या घडीला स्मार्टफाेनमध्ये फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाची ब्रँडिंग सिक्युरिटी फीचर्सच्या धर्तीवर केली जाते. परंतु सर्व स्मार्टफाेन कंपन्या याच्यासाठी डाेळ्याच्या बुबुळाच्या स्कॅनिंगचा (आयरिस स्कॅनिंग तंत्रज्ञान) वापर करत नाहीत. आयरिस स्कॅनिंग तंत्रज्ञान महाग असून त्याच्या वापरामुळे स्मार्टफाेन उत्पादनासाठीचा खर्च वाढताे. त्याचबराेबर आयरिस स्कॅनिंगचे माेबाइल फाेन अनलाॅक हाेण्यासाठी कमी वेळ लागताे.

सुरक्षेसाठी पासवर्ड, पिनचा वापर कायम ठेवा : तज्ज्ञ
शांघाय नेटवर्क सिक्युरिटीचे संस्थापक तान जियानफेंग यांनी सांगितले की, बाेटांचे ठसे आणि चेहरा आेळखणारे तंत्रज्ञान उपयुक्त आहे, परंतु ते पासवर्ड आणि पिनची जागा घेऊ शकत नाही. लाेकांनी आपली वैयक्तिक आणि आर्थिक माहिती पासवर्ड आणि पिनद्वारे सुरक्षित ठेवली पाहिजे. फेशियल रिकग्निशनशी निगडित सूचना काेडमध्ये रूपांतरित हाेतात. जर काेड चाेरी झाला तर त्याचा चुकीचा वापर हाेऊ शकताे. तुम्ही चेहरा किंवा बाेटांचे ठसे बदलू शकत नाहीत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

X