आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका एक्झिक्युटिव्हला पहिल्या नाेकरीत सीईआे हाेण्यास लागतात सरासरी 24 वर्षे, जाेखीम पत्करणारे 14 वर्षांतच हे पद मिळवतात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफाेर्निया - वयवसाय जगतामधील यश हे बऱ्याचदा जाेखीम पत्करण्याच्या क्षमतेशी जाेडल्या जाते. आता ही गाेष्ट संशाेधनातून सिद्ध झाली आहे. सीईआे जिनाेम प्रकल्पांतर्गत केलेल्या संशाेधनानुसार एक एक्झिक्युटिव्हला आपल्या पहिल्या नाेकरीत सीईआे बनण्यासाठी २४ वर्षांचा दीर्घ वेळ लागताे. परंतु जे एक्झिक्युटिव्ह आपल्या करिअरमध्ये माेठी जाेखीम घेतात ते हे यश १४ वर्षांतच साध्य करतात. याचा अर्थ सामान्यांपेक्षा १० वर्षे कमी. सीईआे जिनाेम प्रकल्पांर्तगत १० वर्षांपर्यंत १७ हजार एक्झिक्युटिव्हच्या करिअरचा मागाेवा घेण्यात आला. यामध्ये २ हजार सीईआेंचाही समावेश आहे. संशाेधकांनी अशा प्रकारच्या जाेखमीला करिअर कॅटापल्ट म्हणजे करिअरला उंची देणारे असे संबाेधले आहे. दिवाळखाेरीसारख्या स्थितीत कंपनीला सांभाळणे तसेच खराब कामगिरी करणाऱ्या व्यवसायाचे नेतृत्व करणे अशा प्रकारच्या जाेखीम श्रेणीमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.  जाेखीम पत्करणारे एक्झिक्युटिव्ह अशा प्रकारच्या नाेकऱ्यांसाठी तयार नसतात किंवा यामध्ये असलेल्या धाेक्यांमुळे त्यांचे करिअरही संपू शकते जाेखीम घेणारे एक्झिक्युटिव्ह अनेकदा लहान कंपन्यांची जबाबदारीही सांभाळतात, जेथे ते खुलेपणाने आपले निर्णय घेऊ शकतात. या प्रकारच्या प्रयत्नांमुळे एक्झिक्युटिव्हला आपली क्षमता प्रदर्शित करणे तसेच ती सिद्ध करण्याच्या संधी मिळतात. या प्रकारच्या जाेखीम घेऊन ते तणावाच्या क्षणांमध्ये धाडसी पाऊल घेऊ शकतात व नवीन काही करू शकतात. महिलांची जाेखीम घेण्याची क्षमता जास्त महत्त्वाची ठरते. कारण ती पुरुषांच्या तुलनेत त्यांना सीईआे बनण्यामध्ये जास्त मदतनीस ठरू शकते. स्पेन्सर स्टुअर्ट या एक्झिक्युटिव्ह सर्च कंपनीच्या नुसार ८५ % ज्येष्ठ महिला एक्झिक्युटिव्हची जाेखीम पत्करण्याची क्षमता त्यांना करिअरमध्ये उंची गाठण्यासाठी सर्वात महत्त्वाची मानली जाते. जेव्हा त्या स्वत: एखाद्या कामासाठी पूर्णत: तयार नसल्याचे मानतात.

निर्णय घेण्यास सक्षम सीईआे १२ पट जास्त यशस्वी
जे सीईआे निर्णय घेण्यात सक्षम असतात ते साधारण सीईआेंच्या तुलनेत १२ पट जास्त सक्षम असतात असे संशाेधनात म्हटले आहे. कारण जाेखमीचे स्मार्ट व्यवस्थापन करणे ही त्यांची सर्वात माेठी खासियत असते. ऊहापाेह करणारे सीईआे न स्वत: चांगली कामगिरी करत ना त्यांची कंपनी चांगली कामगिरी करू शकत.