आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक आदर्श विवाह... ना मंडप सजला ना बँडबाजा, आर्किटेक्ट वधू आणि मलेशियातील फायर फिटर वराने १६ मिनिटांत घेतले फेरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पठाणकोट - पठाणकोट येथील हरगोविंदपूर येथील आर्किटेक्ट वधू आणि मलेशियातील फायर फिटर वराने रविवारी अवघ्या १६ मिनिटांत सात फेरे घेतले. लग्नात होणारा अफाट खर्च टाळण्यासाठी या दोघांनी अत्यंत साधेपणाने विवाहाचे विधी पार पाडले आणि समाजासमोर एक आदर्श उदाहरण घालून दिले.  लग्नात ना सजवलेला मंडप उभारण्यात आला होता ना बँडबाजा लावला. नवरदेवाने याप्रसंगी काेणतीही भेटवस्तू स्वीकारली नाही. लग्नात २०० वऱ्हाडी मंडळी होती. नाष्ट्यात चहा आणि बिस्किटे ठेवण्यात आली होती. कबीरपंथी पद्धतीने  सर्व विधी पार पडले. 

 

कुप्रथा बंद करणे हाच उद्देश : प्रीती

पंजाबमधील गुरदासपूरजवळील खुदादपूर येथील अंकुश दास (२७) व श्री हरगोविंदपूर येथील प्रीती दास (२३) यांच्या लग्नात कबीरवाणी झाली. नंतर रामायणाचे पाठ सुरू असताना कबीर महाराजांच्या फोटोभोवती सात फेरे घेण्यात आले. अंकुश हा मलेशियामध्ये फायर फिटर आहे. चांगला पगार असतानाही त्यांनी साधेपणाने विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. प्रीतीने सांगितले, आपण २०१६ मध्ये पॉलिटेक्निक महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीची पदविका घेतली. त्यानंतर भटिंडा येथे नकाशे तयार करण्याचे सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर आर्किटेक्टची पदवी घेतली. लग्नात असलेल्या कुप्रथा दूर करण्यासाठी आम्ही साधेपणाने विवाह करत आहोत. प्रीतीचे वडील पाणीपुरवठा विभागात नोकरीस आहेत. समाजातील सर्व प्रतिष्ठित मंडळींनी या विवाह सोहळ्याचे कौतुक केले. समाजातील हुंडा पद्धती बंद करणे, नशामुक्त समाज घडवणेे आणि  अवास्तव खर्च टाळून सामूहिक विवाह सोहळे आयोजित करणे हा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

वायफळ खर्च करण्यापेक्षा पैसा सत्कारणी लावा...

अंकुश म्हणाला, आम्ही या विवाहाद्वारे वायफळ खर्च   न करण्याचे आवाहन केले आहे. पार्ट्यामधून पैसे का उडवले जातात. हीच रक्कम गरजू मुलांच्या शिक्षणासाठी, कोणाला रोजगार मिळवून देण्यासाठी खर्च करण्यास काय हरकत आहे? असे तो म्हणाला. लग्नात अवाढव्य पैसे खर्च न करता तो पैसा सत्कारणी लावा,असे अावाहन त्याने केले.