आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिल भारतीय साहित्य संमेलनात 5200 पुस्तकांतून साकारली संत गोरोबाकाकांची प्रतिमा, 50 फूट जागेवरील कलाकृती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : शिराढोणचे कलावंत राजकुमार कुंभार यांनी ही प्रतिमा साकारली. 'जग हे शहाणे करणे बापा' हे गोरोबांचे वाक्य ठळकपणे या प्रतिमेच्या खाली पुस्तकांनीच लिहिले.

संमेलनाच्या मुख्य मंचासमोरच ही कला साकारण्यासाठी ५० बाय ५० फुटांची जागा देण्यात आली. तिथेच गोरोबांची झोपडीही तयार करण्यात आली. इथे गोरोबा काकांची महतीही सांगितली जाते.

पुस्तकांना मातीचा सुगंध यावा म्हणून

गोरोबांनी मातीवर प्रेम केले, विठ्ठलाची भक्ती केली, 'म्हणे गोरा कुंभार जीवनमुक्त होणे, जग हे शहाणे करणे बापा' हे त्यांचे गाजलेले वाक्य. साहित्य, अभंगांतून त्याचे सार आहेच, याच पुस्तकांना मातीचा गंध असावा, या उद्देशाने ही कलाकृती साकारली. - राजकुमार कुंभार, कलाकार

९३ वे मराठी साहित्य संमेलन सुरू झाले. मुख्य मंचाचे आकर्षण म्हणजे पुस्तकांतून साकारलेली गोरोबाकाकांची प्रतिमा.
 

बातम्या आणखी आहेत...