Health / गर्भावस्थेमधील असंतुलित थायरॉईड बाळाची वाढ रोखू शकतो 

गर्भावस्थेत थॉयराइडचा स्तर असंतुलित असेल तर आई आणि बाळ या दोघांच्याही आरोग्यावर परिणाम होतो. या स्तराचे प्रमाण वाढले तर गर्भपातदेखील होऊ शकतो.

दिव्य मराठी वेब

Jul 19,2019 12:10:00 AM IST

गर्भावस्थेत थॉयराइडचा स्तर असंतुलित असेल तर आई आणि बाळ या दोघांच्याही आरोग्यावर परिणाम होतो. या स्तराचे प्रमाण वाढले तर गर्भपातदेखील होऊ शकतो. म्हणून ९ महिन्यांदरम्यान या आजारापासून बचाव करण्यासाठी काही उपाय अवश्य करा. याला नियंत्रणात आणून गर्भावस्थेदरम्यान दुष्परिणाम कमी होऊ शकतात.


काय आहे थायरॉईड
आपल्या घशात फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी असते तिला थॉयराइड म्हणतात. ही ट्रायआयोडोथायरोनिन (टी ३) आणि थायरॉक्सिन (टी ४) हार्मोनचे निर्माण करते. हे दोन हार्माेस आपला श्वास, हृदयाचे ठोके, पचनतंत्र, शरीराचे तापमान, हाडे, मांसपेशी आणि कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करते. या हार्माेन्सची अंसतुलित झाली तर वजन कमी किंवा जास्त होऊ शकते. वजन कमी होण्याची स्थिती हायपरथॉयराडिज्म आणि वजन वाढण्याच्या अवस्थेला हायपोथॉयराडिज्म असे म्हणतात. गर्भावस्थेदरम्यान हायपोथॉयराडिज्मची शक्यता जास्त असते.


हे टाळा
थॉयराइडला नुकसान करणाऱ्या या वस्तूंमध्ये गोइट्रोजेंस (ब्रोकली, पत्ताकोबी, फूलकोबी आदी) आणि ग्लूटनयुक्त वस्तूंचा समावेश आहे. यामुळे थाॅयराइडच्या कार्यात बाधा निर्माण होतात.


याचे दुष्परिणाम
थाॅयराइडचा योग्यप्रकारे उपचार न केल्यास काही केसेसमध्ये वेळेपूर्वीच बाळंतपण, रक्तदाब वाढणे किंवा गर्भपाताचा धोका वाढून जातो.


काय खावे : संशोधनामध्ये हे सिद्ध झाले आहे की, आयोडिन, सेलेनियम आणि िझंकयुक्त वस्तू हायपोथाॅयराडिज्ममध्ये फायदेशीर आहे. परंतु आयोडिन आणि सेलिनियमचे सप्लीमेंटस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्या. पौष्टिक आहार म्हणून अंडी, मटन, मासे आणि जास्तीत जास्त फळे आणि भाज्या खा. यामुळे बाळाच्या मेंदूचा विकास होण्यावर परिणाम होतो. थॉयराइड अनियंत्रित झाल्यास कमी वाढ झालेले बाळ जन्माला येऊ शकते. त्याच्यामध्ये इतर आजाराही निर्माण होऊ शकतात.


यासाठी उपाय
- गर्भधारणेपूर्वी थायरॉईडची तपासणी करून योग्य उपचार घेणे गरजेचे आहे.
- गर्भावस्थेदरम्यान नियमितपणे थॉयराइडची तपासणी करून तुमच्या डॉक्टरांकडून उपचारासंबंधी योग्य बदलांबाबत संपूर्ण माहिती घ्या.
- थॉयराइडची लेवल गर्भवती महिलांसाठी वेगळी असते. जी गर्भावस्थेमध्ये महिन्यांनुसार बदलते.
- गर्भावस्थेमध्ये पौष्टिक आहार आणि नियमित जीवन शैलीचे पालन केले तर या आजारावर नियंत्रण करणे सोपे होते.
- दररोज अर्धा तास व्यायाम करा. यामुळे थायरॉइड नियंत्रणात राहते. दररोज ४५ मिनिटे चालणे तुमच्यासाठी फायदेशीर होऊ शकते.
- डॉक्टरांचा सल्ला आणि योग प्रशिक्षकाच्या देखरेखीत काही आसने आणि मेडिटेशन केल्यास लाभ होईल.

X
COMMENT