Death / गुजरातमध्ये एका वृद्ध व्यक्तीने हिंमत करून सापाला पकडले, दोघांनी एकमेकांना चावले, वडोदऱ्यामध्ये घडली घटना 

साप आणि वृद्ध दोघांचा झाला मृत्यू... 

दिव्य मराठी

May 07,2019 12:54:00 PM IST

वडोदरा : गुजरातमधील एक विचित्र परकरां समोर आले आहे. एका वृद्ध व्यक्तीने विषारी सापाला पकडले. सापानेही मग त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी दंश केला. त्यावर संतप्त वृद्ध सापालाच चावला. याचा परिणाम हा झाला की, साप आणि वृद्ध दोघांचाही मृत्यू झाला. गुजरातच्या महीसागर जिल्यामध्ये सापाच्या दंशामुळे 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पण मारण्याअगोदर त्यानेही सापाला चावले आणि त्याला मारून टाकले. वडोदऱ्याहून 120 किलोमीटर दूर संतरामपुर तहसीलच्या अजनवा गावामध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली. गावातील एका अधिकाऱ्याने सोमवारी याची माहिती दिली.

अजनवा गावाचे सरपंच कानू बारियाने सांगितले, पर्वत गाला बारिया एका अशा जागी उभा होता जिथे एका शेतातून ट्रकवर मक्का टाकली जात होती. तेव्हाच एक साप बाहेर आला. त्याला पाहताच बाकीचे लोक पळून गेले, पण तो वृद्ध हा दावा करत तिथे उभाराहील की, त्याने यापूर्वीही अनेक सापांना पकडले आहे.

सरपंच बारियाने सांगितले की, पर्वतला लुनावाड़ा शहरातील दवाखान्यात नेले गेले आणि मग अवस्था गंभीर झालेली पाहून त्याला गोधराला पाठवले गेले. पण सापाचे विष पूर्ण शरीरात पसरले होते. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, अजनवा पोलिसांनी यासंबंधित प्रकारक दाखल करू घेतले आहे.

X