आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहबाह्य संबंधांमुळे आजवर फक्त पुरुष ठरायचे दोषी, जाणून घ्या-एक्स्ट्रा मैरिटल अफेअर असल्यास आता काय होईल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने अॅडल्टरी म्हणजेच स्त्री-पुरुषांच्या विवाहबाह्य संबंधांबाबतचे कलम-497 रद्द केले आहे. कोर्टाने म्हटले की, जी तरतूद महिलेबरोबर असमानता दर्शवते ती घटनाबाह्य आहे. 5 न्यायाधीशांच्या पीठामध्ये असलेल्या जस्टीस चंद्रचूड यांनी म्हटले की, व्याभिचार कायदा एकांगी आहे. तो महिलेच्या सेक्श्युअकल टॉइसला अडथळा आणतो. त्यामुळेच तो घटनाबाह्य आहे. महिलेला लग्नानंतर सेक्श्युअल चॉइसपासून अडवता येणार नाही. 


मध्य प्रदेश हायकोर्टाचे सिनियर अॅडव्होकेट संजय मेहरा यांनी सांगितले की, या निर्णयानंतर घटस्फोटाची प्रकरणे वाढू शकतात. कारण थेट विवाहबाह्य संबंध प्रस्थापित होत असतील तर घटस्फोटही वाढतील. पण घटस्फोट घेणाऱ्याला हे सिद्ध करावे लागेल की, त्याच्या पार्टनरचे विवाहबाह्य संबंध आहेत. त्या फोनचे रेकॉर्डींग, व्हिडिओ किंवा इतर इलेक्ट्रॉनिक प्रूफ पुरावा म्हणून दाखवता येऊ शकतात. 


आतापर्यंत काय व्हायचे 
अॅडल्टरीची कलम 497 नुसार आजवर दुसऱ्याच्या पत्नीबरोबर विवाहबाह्य संबंध असल्यास फक्त पुरुषांनाच दोषी मानले जात होते. महिलेला आरोपी मानले जात नव्हते. जर पुरुष दोषी सिद्ध झाला तर त्याला पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद होती. जर पुरुषाने एखाद्या महिलेशी तिच्या पतीच्या सहमतीशिवाय संबंध ठेवले तर त्याला पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती. पण पतीला जर दुसऱ्या महिलेशी संबंध ठेवायचे असतील तर त्याला पत्नीची सहमती असणे गरजेचे नव्हते. 


कोर्टाच्या नियमानंतर काय बदलले..
- कोर्टाने म्हटले की, अॅडल्टरी गुन्हा ठरणार नाही. पण जर पत्नीने पतीच्या व्याभिचारामुले आत्महत्या केली आणि तसे पुरावे मिळाले तर हे प्रकरण आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे ठरू शकते. 
- कोर्टाने म्हटले की चीन, जपान, ब्राझीलमध्ये गुन्हा ठरत नाही. हा पूर्णपणे प्रायव्हसीचा मुद्दा आहे. 
- कोर्टाने असेही म्हटले की, व्याभिचारामुळे लग्न मोडत नाही तर वैवाहिक जीवनात अडचणी असल्यास व्याभिचाराची स्थिती निर्माण होते. 
- कोर्टने हेही स्पष्ट केले की, घटस्फोटासाठी हे कारण ठरू शकते. म्हणजे कोणी असे केले तर पार्टनर त्याला घटस्फोट देऊ शकतो. 

बातम्या आणखी आहेत...