Home | National | Delhi | Analysis says that BJP will won 50 seats in 2019 loksabha election

हवा कोणत्या दिशेने?, ११ राज्यांत ९०% जागा जिंकलेल्या भाजपने यंदा ५० टक्के जागा जिंकल्या तरी ८५ जागा घटणार

दिव्य मराठी | Update - Apr 12, 2019, 08:37 AM IST

यंदा कोणतीच लाट नाही, भाजपची हीच मोठी डोकेदुखी

  • Analysis says that BJP will won 50 seats in 2019 loksabha election

    विश्लेषण - या निवडणुकींतून एक बाब स्पष्ट होतेय की, ही अनेक राज्यंातील निवडणुकांचा संयोग आहे. अनेक स्थानिक मुद्दे प्रभावी ठरत आहेत. एकही राष्ट्रीय मुद्दा मुख्य भूमिका बजावत असल्याचे दिसत नाही. यात सर्वच राज्यांत चालू शकेल,असा मुद्दा नाही किंवा लाटही नाही. २०१४ मध्ये मोदी समर्थक व काँग्रेस विरोधी लाट आवश्य होती. याच कारणामुळे भाजपने ११ राज्ये उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली, गुजरात, हरियाणा, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व झारखंडच्या २१६ मतदारसंघ म्हणजे ९०% जागा जिंकल्या होत्या. मात्र, या वेळी भाजपने उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, दिल्ली व झारखंडची पकड ढिली झाली आहे. भाजपने या राज्यांतील ५० % जागा पुन्हा जिंकत असला तरीही त्यांच्या ८५ जागा कमी होऊ शकतात. विविध आर्थिक कारणांतून तयार सत्ताविरोधी मतप्रवाह व जात समूहांच्या आघाड्यांनी नवी राजकीय गती निर्माण केली आहे. याला तोंड देण्यासाठी मोदी दहशतवादाविरुद्धची आपली कारवाई रेटत आहेत. मात्र, वास्तवात याचा विशेष परिणाम दिसत नाही. अमित शहा ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशात निशाद पार्टी व शिवपाल यांच्या प्रगतिशील समाजवादी पार्टीशी सूक्ष्म स्तरावर युती करत आहेत, त्यातूनही हे स्पष्ट होत आहे. भाजपची सर्वात मोठी डोकेदुखी सप-बसप आघाडी आहे. दुसरीकडे पूर्व उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी उच्च वर्णीय मतदारांना आकर्षित करत आहेत,त्यातून भाजपची चिंता वाढत आहे. मुरली मनोहर जोशीसारख्या नेत्यांच्या नाराजीमुळे काही ब्राह्मण मतदारही काँग्रेसकडे झुकू शकतात. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड व दिल्लीमध्ये भाजप २०१४ च्या तुलनेत अनेक जागा गमावू शकते. दिल्लीत आप व काँग्रेसची आघाडी जवळपास ठरली आहे. अशा भाजप सर्व ७ जागा गमावू शकते. गुजरातच्या सर्व जागा जिंकणाऱ्या भाजपकडून या वेळी काँग्रेस पाच ते सहा जागा हिसकावण्याची शक्यता आहे.

    > हिंदी भाषिक राज्यांबाहेर भाजपचा जास्त प्रभाव नाही. ईशान्येत भाजप लहान-लहान आघाड्यांच्या जोरावर २५ पैकी २२ जागा जिंकण्याची आशा बाळगून आहे. मात्र, नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे येथील भाजपवर नाराज आहेत. यात निवडणुकीतील लाटेचा अभाव मोदींसाठी चिंता वाढवत आहे.

Trending