आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, काही दिवस अगोदरच मॉन्सूनचे अंदमानात आगमन; हवामान खात्याने दिली माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पुणे - सर्वांजण ज्याची आतुरतेने वाट पाहतात तो मॉन्सून आज अंदमानात दाखल झाला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार शनिवारी मॉन्सून अंदमानात पोचला असून, वाऱ्यांनी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भागापर्यंतचा भाग व्यापल्याचे जाहीर करण्यात आले आहे.


यंदाचा मान्सून उशिरा दाखल होण्याची स्कायमेटने दिली होती माहिती
अंदमान निकोबार बेटे, अंदमानातील समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागात नैऋत्य मोसमी वारे पसरले आहे. यंदाचा मान्सून उशिरा दाखल होणार असल्याची माहिती स्कायमेटने वर्तवली होती. तर अंदमानमध्ये 18-19 मेपर्यंत मान्सून धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.


यावेळी काही दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मान्सून दाखल होत असतो. पण यावेळी मात्रा मान्सून काही दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने यावेळी देशात चांगला मान्सून होणार असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...