आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सुपर-30'चे संस्थापक आनंद कुमार यांना आहे ब्रेन ट्यूमर, एका इंटरव्यूमध्ये स्वतः केला खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : बिहारमध्ये गरीबांसाठी 'सुपर 30' कोचिंग चालवणारे आनंद कुमार यांना ब्रेन ट्यूमर आहे. याचा खुलासा त्यांनी एका इंटरव्यूमध्ये केला आहे. यादरम्यान आनंदने सांगितले की, का त्यांनी त्यांच्या बायोपिकला एवढ्या कमी वयात बनवण्याची परवानगी दिली. न्यूज एजन्सी एएनआईला दिलेला एक इंटरव्यू एंटरटेन्मेंट वेबसाइट स्पॉटबॉयने शेअर केले आहे. 

 

5 वर्षांपूर्वी आजाराबद्दल कळाले... 
चित्रपट रायटर आणि प्रोड्यूसरची इच्छा होती की, बायोपिक लवकरात लवकर बनवला जावा. 2014 मध्ये मी या परिस्थितीमध्ये होतो की, डाव्या कानाने मला काहीच ऐकायला येत नव्हते. 80 ते 90% ऐकण्याची क्षमता संपली होती. पटनामध्ये ईएनटी स्पेशलिस्टकडून उपचार घेतले. दिल्लीमध्ये उपचाराला सुरुवात झाली काही टेस्ट झाल्या नंतर त्यांनी सांगितले की, कानातून जी नस ब्रेनकडे जाते त्यामध्ये ट्यूमर झाला आहे. त्यानंतर मला चक्कर आली. तिथे डॉक्टर्स म्हणाले की, जर तुम्ही ऑपरेशनही नाही केले तरी तुम्ही 10 वर्षे जगाला. पण नंतर एटॉस्टिक न्यूरोमा असे आहे ज्या ऑपरेशनमध्ये जर छोटीशीही चूक झाली तरी तोंड नेहमीसाठी वाकडे होऊ शकते. पापणीही लावता येणार नाही आणि जेवढे ऐकायला येते तेही ऐकायला येणार नाही. मला खूप भीती वाटली आणि मी निर्णय घेतला की, मी ऑपरेशन करणार नाही. आता जे होईल ते पाहून घेता येईल. अजूनही उपचार सुरु आहेत आणि प्रत्येक सहा महिन्यांमध्ये ट्यूमरचे स्कॅनिंग होते.  

 

 

12 जुलैला रिलीज होणार आयचे चित्रपट... 
आनंद कुमारच्या आयुष्यावर सुपर-30 चित्रपट बनवला गेला आहे. या चित्रपटात ऋतिक रोशन लीड रोलमध्ये आहे. तसेच चित्रपटाचे डायरेक्शन विकास बहलने केले आहे. 12 जुलैला चित्रपट 'सुपर-30' रिलीज होत आहे.